दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडली, मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती | deepika padukone hospitalised in mumbai breach candy hospital last nigh due to uneasiness see details | Loksatta

दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडली, मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती

दीपिका पदुकोणच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यानंतर तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं.

दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडली, मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती
दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र आहे. पण यादरम्यान तिच्याबाबत एक माहिती समोर आली आहे. सोमवारी (२७ सप्टेंबर) रात्री अचानक दीपिकाला ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं. रुग्णालयामध्ये गेल्यानंतर तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. पण दीपिकाला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं हे ऐकताच चाहतावर्ग मात्र चिंतेत होता.

नेमकं काय घडलं?

‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, दीपिकाला सोमवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागलं. यामुळे तिला शारिरीक त्रास जाणवू लागला. दरम्यान तिला लगेचच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. सध्यातरी तिची प्रकृती उत्तम असल्याचं बोललं जात आहे. दीपिकाच्या टीमशी याबाबत संपर्क साधता त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नसल्याचं ‘पिंकविला’ने म्हटलं आहे.

याआधी काही महिन्यांपूर्वी दीपिकाची प्रकृती बिघडली होती. हैद्राबाद येथे अभिनेता प्रभासबरोबर चित्रीकरण करत असताना तिला हृदयाचा त्रास जाणवू लागला. तिच्या हृदयाचे ठोके वाढले. दरम्यान तिला हैद्राबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

दीपिकाच्या हाती सध्या बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामध्ये ती काम करताना दिसेल. पुढील वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर

संबंधित बातम्या

अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफची अनेक वर्षांनी झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
Sher Shivraj नंतर ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीला;’हा’ अभिनेता साकारणार तानाजी मालुसरेंची भूमिका
PHOTO : अखेर एकताला मिळाला तिचा व्हॅलेंटाइन
तिरस्कारापेक्षा अधिक प्रेक्षक ‘मालविका’चं कौतुक करतात – अदिती सारंगधर
Death Anniversary : पडद्यावर खलनायकाची दहशत निर्माण करायला निळू फुलेंना डायलॉगची गरज भासत नव्हती…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकलो- एकनाथ शिंदे
“पंढरपूरमधील विठोबाही…”; कर्नाटकचा उल्लेख करत शिंदे-भाजपा सरकारच्या धोरणांबद्दल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप
“दादा तुम्हाला कुठून माईक खेचायला…”, पत्रकार परिषदेला पोहोचताच उद्धव ठाकरेंची अजित पवारांना विचारणा, जयंत पाटीलही लागले हसू
ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘पिचर्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा; या दिवशी होणार प्रदर्शित
“मी नेहमी तुझ्याबरोबर…” वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत