दीपिका पादुकोण आता संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ चित्रपटाचा भाग नसली तरी तिच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आहे. आता ती अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटली यांच्या नवीन चित्रपटात एंट्री करत आहे, ज्यामध्ये ती धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

दीपिका पादुकोणने अ‍ॅटलीबरोबर ‘जवान’ चित्रपटात काम केले होते, जो ब्लॉकबस्टर ठरला होता. आता ती त्याच्याबरोबर आणखी एक चित्रपट करणार आहे. अल्लू अर्जुनबरोबर दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट असेल. या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहोत.

अल्लू अर्जन आणि अ‍ॅटली यांच्या चित्रपटाची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी आज शनिवारी (७ जून) एक ब्लॉकबस्टर टीझर रिलीज केला आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात दीपिका पादुकोणदेखील दिसणार आहे. ती तिचे अ‍ॅक्शन कौशल्य दाखवणार आहे. टीझरमध्ये ती तलवारबाजी आणि घोडेस्वारी करताना दिसत आहे.

निर्मात्यांनी केले दीपिकाचे स्वागत

निर्मात्यांनी काल शुक्रवारी (६ जून) अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुन यांच्या ‘AA22xA6’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. आज शनिवारी (७ जून) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट सन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनवला जात आहे. सन पिक्चर्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात दीपिका पादुकोणदेखील दिसत आहे. निर्मात्यांनी चित्रपटात तिचे स्वागत केले आहे. टीझरबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘विजयाच्या मार्गावर कूच करणारी राणी, दीपिका पादुकोणचे स्वागत आहे.’

निर्मात्यांनी रिलीज केलेल्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन दिसत नाहीये. फक्त दीपिका आणि अ‍ॅटली दिसत आहेत. दोघेही बोलत आहेत आणि अ‍ॅटली अभिनेत्रीला तलवारबाजी समजावून सांगत आहे.

टीझरमध्ये दीपिका ज्या पद्धतीने दिसत आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की ती चित्रपटात एक दमदार भूमिका साकारणार आहे. प्रेक्षकांना तिच्या अ‍ॅक्शनची ताकदही पाहायला मिळेल. अल्लू अर्जुनचा अ‍ॅटलीबरोबरचा हा पहिलाच चित्रपट आहे. पण, दीपिकाने ‘जवान’ चित्रपटात दिग्दर्शकाबरोबर काम केले आहे. दीपिका ‘स्पिरिट’ चित्रपटातून बाहेर पडली असताना, या मोठ्या चित्रपटात तिच्या प्रवेशाची बातमी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीझरला युजर्स सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. दीपिका पादुकोणच्या एंट्रीबद्दल उत्सुकता आहे. अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटली यांचा हा आगामी चित्रपट एक सायन्स-फिक्शन अ‍ॅक्शन चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट असेल.