scorecardresearch

ही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री

तिने नुकताच आपल्या बालपणीचा एक फोटो इन्स्टग्रामवर शेअर केला आहे.

ही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये सध्या थ्रोबॅक पिक्चर असा ट्रेंड सुरू आहे. अनेक कलाकार #ThrowBackPictureअसा हॅशटॅग वापरुन आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आतापर्यंत रणवीर सिंग, इलियाना डिक्रूज, शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी, विकी कौशल यांसारख्या अनेक कलाकारांनी आपले थ्रोबॅक पिक्चर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर आता या यादीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हे नाव जोडले गेले आहे. तिने नुकताच आपल्या बालपणीचा एक फोटो इन्स्टग्रामवर शेअर केला आहे.

Viral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका

 

View this post on Instagram

 

This Humpty & Dumpty sat on a wall…& ate curd rice!!! @divya_narayan4

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

घडल असं की, ‘सनी’नं मागितली ‘सनी’ची माफी

या फोटोत दीपिकाने पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. खास मैत्रिणीसोबत दीपिकाने काढलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याआधी तिचा करिना कपूर व जॉन अब्राहम सोबत काढलेला एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

Unseen pic of Kareena with John Abram and Deepika

A post shared by Kareena & Sidharth FC (@kareena_sidharth_fc) on

सध्या दीपिका ‘छपाक’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची कथा अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट येत्या १० जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या