‘छपाक’मधील दीपिकाचा आणखी एक लूक व्हायरल

‘छपाक’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

deepika padukone
दीपिका पदुकोण

अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण लक्ष्मीची भूमिका साकारत असून यासाठी तिने बरीच तयारी केली आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा दीपिकाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लक्ष्मीच्या भूमिकेतील दीपिकाचा हा लूक थक्क करणारा आहे.

दीपिकाच्या या लूकची लक्ष्मीनेही प्रशंसा केली. ‘चित्रपटातील दीपिकाचा लूक पाहून मी फार खूश झाले. सेलिब्रिटी अशा लूकमध्ये समोर येताना पाहून चांगलं वाटतं,’ असं ती म्हणाली.

मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी अभिनेता विक्रांत मेस्सीला दिली आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात येणार आहे. तसेच मालती उर्फ दीपिकाला अॅसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे. छपाक हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone poses happily in her chhapaak look during the shoot