शाहरुख खानमुळे नव्हे तर ‘या’ कारणामुळे दीपिकाने निवडला ‘पठाण’, मुलाखतीदरम्यान केला खुलासा

यावेळी तिने ‘पठाण’ चित्रपट निवडण्यामागचे खरे कारण सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी ‘गहराइयां’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणसह सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दीपिकाने काही इंटिमेट सीन्स दिले असून त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या दीपिका ही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यावेळी तिने ‘पठाण’ चित्रपट निवडण्यामागचे खरे कारण सांगितले आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिकाला तिच्या आणि शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. यावेळी तिने हा चित्रपट नेमका कसा निवडला? त्यामागे तिचा नेमका विचार काय होता? याबद्दल प्रश्न विचारले होते. विशेष म्हणजे दीपिकाने शाहरुख खान हा या चित्रपटात असल्याने तिने यात भूमिका करण्यास होकार दिला, असे तर्क विर्तक सुरु होते.

मात्र नुकतंच तिने याबाबतच स्पष्टीकण दिले आहे. दीपिकाने शाहरुख खानमुळे या चित्रपटाला होकार दिलेला नाही. ‘पठाण’ चित्रपट निवडण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचे स्क्रिप्ट, असे दीपिका म्हणाली.

Richard Gere Kissing Case: किसिंगप्रकरणातून तब्बल १५ वर्षांनी शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा, पाहा नेमकं प्रकरण काय?

यावेळी दीपिका पदुकोणला रणवीर सिंहबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. तू रणवीर सिंहच्या गायनाला १० पैकी किती नंबर देशील? असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला. दीपिकाने याचे फार मजेशीर पद्धतीने उत्तरही दिले. रणवीर सिंहला मी १० पैकी फक्त २ नंबर देईन, असे दीपिका म्हणाली.

दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांनी यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपिकाने शाहरुखच्या ‘ओम शांती ओम’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर दोघे ‘हॅपी न्यू इयर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये एकत्र दिसले होते. त्यानतंर आता दरम्यान पठाण या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात शाहरुख हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepika padukone reveals what made her sign shahrukh khan pathan movie nrp

Next Story
रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी