दीपिका पदुकोणने तिच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्रीने आत्तापर्यंत बॉलीवूडमधील जवळपास सर्वच स्टार्ससोबत काम केले आहे पण ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसलेली नाही. अशा परिस्थितीत, सलमान खान आणि दीपिका पदुकोण चित्रपटाच्या चाहत्यांनी ते एकत्र कधी दिसणार हे विचारणे योग्य आहे. या प्रश्नाच्या उत्तरात दीपिका पदुकोणने एक मोठा खुलासा केला आहे. दीपिकाने सांगितले की, मी शाहरुख खानसोबत नाही तर सलमान खानसोबत डेब्यू करणार होती, मात्र तिने अभिनेत्याची ऑफर नाकारली होती.

दीपिका पदुकोणने नुकतंच ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान दीपिकाला सलमानसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी दीपिका म्हणाली, “आमच्या दोघांचे नाते फार सुंदर आहे. मी त्याची नेहमीच आभारी असेन, कारण मला चित्रपटाची ऑफर देणारा सलमान हा पहिला व्यक्ती होता. पण त्यावेळी मी त्यासाठी तयार नव्हती.”

Surya's revelations about Bumrah
MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Hayden gives batsman Tips to face Mayank
IPL 2024 : मयंक यादवचा झंझावात कसा रोखायचा? मॅथ्यू हेडनने फलंदाजांना दिला गुरुमंत्र
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

“जेव्हा मला सलमान खानने चित्रपटाची ऑफर दिली. तेव्हा मी मॉडेलिंगसाठी सुरुवात केली होती. कुणीतरी माझे काम त्याला सांगितले किंवा त्याने स्वत: ते पाहिले. त्यामुळेच त्यांनी ही ऑफर दिली होती”, असेही तिने म्हटले. यावेळी दीपिकाने त्या चित्रपटाचे नाव सांगितले नाही.

मात्र पुढे ती म्हणाली, “त्या काळात मी चित्रपटांसाठी तयार नव्हती. मला अभिनेत्री व्हायचे नव्हतं. पण त्यानंतर दोन वर्षांनी मला ओम शांती ओम मिळाला आणि तो माझा पहिला चित्रपट ठरला. पण मला सलमानने संधी दिल्याबद्दल मी त्याची नेहमीच आभारी असेल. त्यावेळी त्याला माझ्यात एक वेगळी क्षमता असल्याचे दिसले, ज्याची कल्पनाही मी केली नव्हती. बॉलिवूडमध्ये १५ वर्षांनंतर आता मी हृतिक रोशनसोबत फायटर या चित्रपटात काम करणार आहे.”

“मीच मूर्ख होते की त्याला दुसरी संधी दिली…”, दीपिका पदुकोणने केला एक्स बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा

दरम्यान दीपिका पदुकोण ‘फायटर’, ‘पठाण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंह हा जयेशभाई जोरदार आणि ‘सर्कस’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.