आजही दीपिकाचा टॅटू तिच्या पाठीशीच

रणबीर कपूरसाठी दीपिकाने आर के टॅटू गोंदवून घेतला होता

दीपिका पादुकोण

७० व्या कान चित्रपट महोत्सवाला बुधवारपासून सुरूवात झाली. या महोत्सवात जगभरातले उत्तमोत्तम फिचर आणि डॉक्युमेंटी दाखवल्या जातात. पण याचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे रेड कार्पेटवर अवतरणारे तारे- तारका. आपले आवडते कलाकार नक्की कोणता ड्रेस घालतात, मेक-अक कसा करतात, यंदा काही नवीन केलंय की नाही हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

कान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही दीपिका पादुकोणचेच जलवे पाहायला मिळाले. हिरव्या रंगाच्या गाउनमध्ये दीपिका खरंच मादक दिसत होती. ड्रेसला साजेसा मेकअप आणि डोक्यावर उंच बांधलेले केस या ग्लॅमरस लूकमुळे सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी दीपिकाने एका साबणाची जाहिरात केली होती. या जाहिरातीत तिच्या मानेवरचा टॅटू दिसत नव्हता. त्यामुळे दीपिकाने रणबीर कपूरसाठी गोंदलेला टॅटू काढून टाकला की काय असा प्रश्न अनेकांना पडत होता. पण कान महोत्सवात तिच्या मानेवरचा टॅटू स्पष्ट दिसत असून अजूनही आर के तिच्या पाठीशी आहे असं म्हणायला हरकत नाही.

https://www.instagram.com/p/BT4duCuFvdD/

‘बाजीराव मस्तानी’ अभिनेत्री दीपिकाने २०१० मध्ये रोहित बालची साडी नेसत कान महोत्सवात पदार्पण केले होते. तसेच याचवर्षी तिचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स’ ही प्रदर्शित झाला होता. या सिनेमात दीपिकासोबत विन डिझेलही होता. सध्या तरी दीपिकाने दुसरा कोणताही हॉलिवूडपट स्वीकारला नसला तरी ती विविध प्रॉडक्टच्या जाहिरातींच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. दरम्यान, ऐश्वर्या राय १५ वर्षांनी तिचा ‘देवदास’ हा सिनेमा कान महोत्सवात दाखवणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone still has rk tattoo her photos from cannes 2017 are a proof

ताज्या बातम्या