“नीट वाग आता माझं लग्न झालंय…” भर कार्यक्रमात ओरडली दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.

“नीट वाग आता माझं लग्न झालंय…” भर कार्यक्रमात ओरडली दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण तिचा पती रणवीर सिंग आणि कुटुंबियांसोबत कॅलिफोर्नियातील एका कोंकणी संमेलनात सहभागी झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. दीपिका पदुकोणला ब्यूटी विथ ब्रेन असंही म्हटलं जातं. अनेक मुलाखतींमध्ये दीपिका अतिशय हुशारीने प्रश्नांची उत्तरं देताना दिसली आहे. आताही दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिनं आपल्या उत्तरानं भर कार्यक्रमात एका चाहत्याला गप्प केलं. दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.

दीपिका पदुकोण तिचा पती रणवीर सिंग आणि कुटुंबियांसोबत कॅलिफोर्नियातील एका कोंकणी संमेलनात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात दीपिकाच्या देसी अंदाजानं सर्वांचीच मनं जिंकली. तिच्या या लुकवर चाहते देखील फिदा झाले. दीपिकाचा याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या कार्यक्रमात एक चाहता दीपिकाला पाहून ‘वी लव्ह यू’ असं ओरडताना दिसत आहे. यावर दीपिकानंही त्याला “मी आता विवाहित आहे. जरा नीट वाग” असं उत्तर दिलं. अर्थात दीपिकाची ही प्रतिक्रिया रागात नव्हती. ती यावेळी फारच कूल अंदाजात असलेली पाहायला मिळाली.

दरम्यान दीपिकानं या कार्यक्रमासाठी निवडलेल्या आउटफिट्सची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रामात ती गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. तिचा हा देसी अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. केसांचा बन आणि कानात मोठे झुमके तिचं सौंदर्य खुलवत होते. अमेरिकेत पार पडलेल्या या कोंकणी समजाच्या संमेलनात दीपिका पदुकोण पती रणवीर सिंहसोबत सहभागी झाली होती. या दोघांचेही या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Big Boss 16 : नव्या सीझनमध्ये सहभागी होणार ‘हे’ १७ स्पर्धक?, मराठी ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाचाही समावेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी