scorecardresearch

Premium

सुपरफ्लॉप ठरलेल्या ‘शमशेरा’मागील ग्रहण संपेना; कोर्टाने निर्मात्यांना एक कोटी जमा करण्याचे दिले आदेश

दिल्ली हायकोर्टाने निर्मात्यांना एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Ranbir Kapoor box office collection Shamshera
अभिनेता रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा फार कमी प्रतिसाद मिळाला होता.

अभिनेता रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट २२ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. यशराजने बनवलेल्या या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त संजय दत्त आणि वाणी कपूरच्या मुख्य भूमिका होत्या. रणबीरचा कमबॅक सिनेमा असलेला ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण चित्रपट यंदाच्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला. त्यानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी ओटीटीवर रिलीज केला. आधीच फ्लॉप ठरलेल्या या चित्रपटामागचे ग्रहण संपायचे नाव घेत नाहीये. कारण आता दिल्ली हायकोर्टाने निर्मात्यांना एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – “सलमान खान मानसिक आजारी…”; अभिनेत्याच्या एक्सने इन्स्टा पोस्टमधून केले गंभीर आरोप

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

दिल्ली हायकोर्टाने हा चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे. परंतु OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी, निर्मात्यांना रजिस्ट्रेशन म्हणून एक कोटी रुपये जमा करावे लागतील. बिक्रमजीत सिंग भुल्लर यांनी दाखल केलेल्या या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी केली. हा चित्रपट ‘कबू ना छेडे खेत’ या साहित्यकृतीमधील कॉपीराइटचे उल्लंघन करत असल्याचा आरोप भुल्लर यांनी चित्रपट निर्मात्यांवर केला होता.

हेही वाचा – KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये का?

“गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला चित्रपट आणि शुक्रवारी OTT वर रिलीज झाला, पण ते प्रदर्शन कायम ठेवण्यासाठी निर्मात्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे एक कोटी रुपये जमा करावे लागतील. दोन्ही पक्षांमध्ये संतुलन ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” असं १८ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी सांगितलं.

हेही वाचा – “मी आईच्या मैत्रिणीसोबत सेक्स केल्याचं समजताच…”; ‘लॉक अप’ फेम शिवम शर्माने सांगितली कुटुंबियांची प्रतिक्रिया

दरम्यान, २२ ऑगस्ट पर्यंत निर्मात्यांना एक कोटी रुपये जमा करावे लागतील. या तारखेपर्यंत पैसे जमा न केल्यास चित्रपटाच्या ओटीटी रिलीजवर ब्रेक लावला जाईल, असंही दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi hc allows ott release of ranbir kapoor shamshera asks producers deposite 1 crore for registration hrc

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×