‘कॉलेज रोमान्स’ नावाची टीव्हीएफची वेब सीरिज वादात सापडली आहे. दिल्ली हायकोर्टाने ‘कॉलेज रोमान्स’ या सीरिजविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेटचे नियमन करण्यासाठी योग्य कायदा किंवा मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या आव्हानाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.

“तुझ्या आयुष्यातून हरवलेले रंग…” कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला लिहिलं प्रेम पत्र

या सीरिजमध्ये वापरण्यात आलेली भाषा असभ्य आणि आक्षेपार्ह होती आणि ते पाहताना इअरफोन वापरावे लागले, असं निरीक्षण न्यायालयाने नमूद केलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नैतिकतेची वेगळी व्याख्या आहे आणि त्यासाठी न्यायालयाने पश्चिमेकडे नाही तर स्वतःच्या नियमांकडे पाहण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Video: दमदार अ‍ॅक्शन अन् थरार; प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’चा ट्रेलर प्रदर्शित, अवघ्या काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज

‘लाइव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी सांगितलं की, सार्वजनिक डोमेन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असभ्य भाषेचा वापर वाढतो आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण हे सर्व प्लॅटफॉर्म्स लहान वयातील मुलांसाठी खुले आहेत.

“सामान्य माणसाच्या अनुषंगाने विचार करून न्यायालय या निष्कर्षापर्यंत पोहोचले की या देशातील बहुसंख्य लोक असे अश्लील, अपवित्र, असभ्य, शिवीगाळ करणारे शब्द आणि अपशब्द वापरत आहेत, असे म्हणता येणार नाही, जसे वेब सीरीजमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये असे शब्द बोलताना दाखवण्यात आले आहेत,” असं न्यायालयाने म्हटलं आहे.

MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेचीच हवा; सुंबूलबरोबर केला जबरदस्त डान्स, Video पाहिलात का?

तक्रारदाराने आरोप केला होता की ॉ सीरीजमध्ये अश्लील व व्हल्गर कंटेंट आहे. सीरिजमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ आणि २९४, माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि ६७ अ आणि कलम २ (क), ३ आणि ४ चे उल्लंघन झाले आहे. तसेच यात महिलांना अश्लील स्वरूपात दाखवले आहे, असंही तक्रारकर्त्याचं म्हणणं होतं. कोर्टाने यावर सुनावणी करताना वेब सीरिजविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.