Premium

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

सोशल मीडियावर अमृता फडणवीस या कायम त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्याबद्दलचे अपडेट देत असतात

amruta-fadanvis-daughters-day-post
फोटो : अमृता फडणवीस / ट्विटर अकाऊंट

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच त्यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे चर्चेत असतात. पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही जास्तच चर्चा आपल्याला पाहायला मिळते. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. बँक अधिकारी, गायिका अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर अमृता फडणवीस या कायम त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्याबद्दलचे अपडेट देत असतात. नुकतंच अमृता फडणवीस यांनी त्यांच्या मुलीसाठी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. आज ‘जागतिक कन्या दिन’ निमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांच्या कन्येबरोबरचे काही फोटोज शेअर केले आहेत.

आणखी वाचा : पैशांसाठी नव्हे तर ‘या’ गोष्टीमुळे सोडली ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिका; शैलेश लोढांनी प्रथमच दिलं स्पष्टीकरण

आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी ही फोटो शेयर करत ‘जागतिक कन्या दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये अमृता फडणवीस अन् त्यांच्या कन्येने पांढऱ्या शुभ्र रंगाचा सुरेख असा वन पीस ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये आई व मुलीमधील काही सुंदर क्षण फोटोग्राफरने टिपले असून ते अमृता फडणवीस यांनी शेअर केले आहेत.

ही पोस्ट शेयर करताना अमृता फडणवीस लिहितात, “माझी मुलगीही उत्तम आहे कारण ती म्हणजे माझं प्रतिबिंब आहे. कन्या दिनाच्या शुभेच्छा.” अमृता फडणवीस यांची ही पोस्ट आणि हे गोड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनीही आपआपल्या कन्येचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deputy cm devendra fadnavis wife amruta fadanvis shares a special post for her daughter avn

First published on: 24-09-2023 at 20:12 IST
Next Story
मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण गौतमी पाटीलला आवडतं; म्हणाली…