झी मराठीच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हजेरी लावली. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो झी मराठीने शेअर केले आहेत. यात विविध गंमतीजमती पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी अमृता फडणवीसांना विविध राजकीय घटनांसह खासगी आयुष्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यासोबत त्यांनी गाण्याची आवड, जेवण आणि ट्रोलिंग यावरही उत्तर दिलखुलासपणे उत्तरं दिली. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना मंगळसूत्र घालण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच हटके उत्तर दिले.

“ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत अन्…” अमृता फडणवीसांची अप्रत्यक्ष टोलेबाजी

‘तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं नाही तर तुम्हाला सासूबाई ओरडत नाही का?’ असा प्रश्न अमृता फडणवीस यांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका महिलेने विचारला होता. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतिक असते. त्यामुळे आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा हातात हात धरला पाहिजे. म्हणूनच मी माझ्या हातात मंगळसूत्र घालायला लागली.”

बस बाई बस : “…तर माझ्या त्यांना शुभेच्छा”, सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारला अप्रत्यक्ष टोला

त्यामुळे देवेंद्रजींनी माझा हात धरला आहे, असे मला वाटते. त्यावेळी अमृता फडणवीसांनी प्रश्न विचारणाऱ्या महिलेला प्रतिप्रश्न केला की, ‘तुम्ही मंगळसूत्र गळ्यात घातलेय म्हणून नवऱ्याने तुमचा गळा पकडलाय, असे तुम्हाला वाटत असेल.’ यानंतर उपस्थित सर्वांमध्ये हशा पिकला.

अमृता फडणवीसांच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खळखळून हसत दाद दिली. तर सुबोध भावे यांनी वाहवा असे म्हटले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis talk about mangalsutra bus bai bus video viral nrp
First published on: 04-08-2022 at 18:16 IST