भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर्सपैकी एक मनीष मल्होत्रा आहे. लवकरच मनीष बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, मनीष अभिनयात नाही तर दिग्दर्शनात त्याच नशीब आजमावणार आहे. मनीष मल्होत्रा ​​लवकरच म्युझिकल लव्ह स्टोरी बनवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मनीष मल्होत्राच्या चित्रपटाची निर्मिती करण जोहरचे प्रॉडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शन्स करणार आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाची कथा स्वत: मनीषने लिहिली आहे. लवकरच या चित्रपटासाठी कास्टिंग सुरू होईल असे रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. हा चित्रपट भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या कहाणीवर आधारीत असणार आहे. ही एक म्युजीकल लव्ह स्टोरी असणार आहे.

आणखी वाचा : ‘…म्हणून मला बाळाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर करायची गरज वाटत नाही’ : करीना कपूर


आणखी वाचा : ‘मला तैमूरची शी साफ करता येत नव्हती, मी एक परिपूर्ण आई नव्हते…’, करीनाने केला खुलासा

मनीषने ३० वर्षांच्या करीअरमध्ये ८०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझायनिंगचे काम केले आहे. ‘रंगीला’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’ सारख्या शेकडो सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. आता फॅशनमध्ये एवढं यश मिळाल्यानंतर मनीषला दिग्दर्शनात किती यश मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.