“त्याच्या तिरडीचा मोडला बांबू…”, सरु आजीने डॉक्टरला दिली धमकी

सरु आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

devmanus 2, saru aaji, marathi drama
सरु आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने सगळ्यांचा निरोप घेतला होता. आता या मालिकेचा २ सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा पहिला एपिसोड १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. तर हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मालिकेचा प्रोमो ‘देवमाणूस २’च्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सगळ्यात आधी डॉ. अजितकुमार देवचे एक बॅनर दिसते. यात गावकऱ्यांनी डॉक्टरांचे पहिले पुण्यस्मरण केले आहे. त्यानंतर सरु आजी तो बॅनर फाडतं पुढे येत असल्याचे दिसते. आता सरू आजी भेटायला येणार ही बातमी ऐकल्यानंतर प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे. आजीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ‘जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येतेय’, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

‘देवमाणूस’ ही मालिका जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, तेव्हा पासून मालिकेतील सरु आजी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील सरु आजीच्या म्हणींचे मीम्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. एक तासाच्या विशेष भागाने मालिका १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर सोमवार ते शनिवार ही मालिका आपल्याला रात्री १०.३० वाजता पाहायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devmanus 2 new promo saru aaji coming soon dcp

ताज्या बातम्या