झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. किरण गायकवाडने यापूर्वी ‘लागीर झालं जी’ या मालिकेत भूमिका साकारली होती. तेव्हाही किरणच कौतुक प्रेक्षकांनी केलं होत. किरण सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. किरणने कालच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudhi Padwa 2022) त्याच्या आयुष्यातील एक खास गोष्ट शेअर केली आहे.
अभिनेता किरण गायकवाडने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन चारचाकी खरेदी केली आहे. याची माहिती चाहत्यांना देत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याने पोस्ट करतना लिहले की “आता पुढचा प्रवास हिच्या सोबत”. किरणच्या चाहत्यांनी त्याचं नवीन कारसाठी अभिनंदन केलं आहे. किरणने किया या कंपनीची गाडी घेतली आहे.
किरणची मुख्य भूमिका असलेल्या देवमाणूसच्या पहिल्या सीजनला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालेला. आता ‘देवमाणूस २’ मध्येही किरणच्या अजितकुमार देवची भूमिका चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. किरण नकारात्मक भूमिका सकारात असला तरी त्याला प्रेक्षक पसंती मिळत आहे.