छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस ओळखला जातो. सध्या बिग बॉसचे १५वे पर्व चर्चेत आहे. या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यामध्ये सतत वाद होत असल्याचे दिसत आहे. आता देवोलिनाने चक्क अभिजीत बिचुकलेच्या पत्नीला आणि मुलांना भेटण्यास नकार दिला आहे.

बिग बॉसच्या घरात फॅमिली स्पेशल स्टाकसाठी स्पर्धकांच्या कुटुंबीयांना घरात बोलवण्यात आले होते. त्यावेळी बिचुकलेची पत्नी आणि मुले बिग बॉसच्या घरात आले होते. त्यावेळी बिचुकलेच्या पत्नीने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांशी संवाद साधला. ‘ते कादाचित तुम्हाला खूप चुकीच्या गोष्टी बोलले असतील पण जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा हे सगळं विसरुन जा. ते कधीच मनातून अशा गोष्टी बोलत नाहीत. पटकन बोलून जातात. ते कधीही महिलांकडे अशा प्रकारे पाहात नाहीत’ असे बिचुकलेची पत्नी म्हणाली.
Video: अल्लू अर्जुन स्वत:च्याच हिंदी आवाजावर झाला फिदा; श्रेयस तळपदेचं कौतुक करत म्हणाला…

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले

त्यानंतर प्रतिक आणि रश्मी देसाई देवोलिनाला बिचुकलेच्या पत्नीला भेटण्यासाठी बोलवायला जातात. त्याच्या मुलांतरी भेट असे ते दोघे देवोलिनीला बोलतात. ‘त्याची मुले आणि पत्नी खरच खूप चांगली आहे. तू ये आणि त्यांना भेट’ असे प्रतिक देवोलिनाला बोलताना दिसतो. पण देवोलिना तयार होत नाही. ‘ते असतीलही चांगले, पण मला त्यांना भेटण्यात रस नाही. ज्या माणसाशी मला काही संबंध ठेवायचे नाहीत त्याच्या कुटुंबीयांना भेटून मी काय करु?’ असे देवोलिना म्हणाली.

काही दिवसांपासून अभिजित बिचुकले आणि देवोलिना भट्टाचार्जी चर्चेत आहेत. त्यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष त्यांनी वेधले होते. अभिजितने देवोलिनाकडे कोणताही विचार न करता सगळ्यांसमोर किस करण्याची मागणी केली होती. त्यानंतर देवोलिना आणि अभिजीतमध्ये मोठा वाद झाला.