Dhanashree Verma reacts to Yuzvendra Chahal Divorce Rumours : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी, अभिनेत्री-कोरियोग्राफर धनश्री वर्मा हे लग्नाच्या जवळपास पाच वर्षानंतर वेगळे होत असल्याची चर्चा सुरू आहेत. इन्स्टाग्रामवर या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचे आढळून आल्यानंतर या चर्चांना जास्तच उधाण आल्याचे दिसून आले. यादरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहे. या सर्व चर्चांदरम्यान धनश्री वर्माने एक इस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तीने गेले काही दिवस तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप कठीण ठरत असल्याचे म्हटले आहे. तसेच धनश्रीने ट्रोल्सना देखील फटकारले आहे.

धनश्रीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काय म्हटलं?

धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. तिने ट्रोलर्सकडून चारित्र्यहनन केले जात असल्याचा आरोप केला आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली की, “गेले काही दिवस माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूपच कठीण गेले आहेत. निराधार लिखाण, गोष्टीची सत्यता न तपासणे आणि द्वेष पसरवणाऱ्या बिना चेहर्‍यांच्या ट्रोल्सकडून केले जाणारे माझ्या प्रतिष्ठेची चारित्र्यहनन हे खरोखर अस्वस्थ करणारे आहे”.

Mamta Kulkarni On Dhirendra Shastri (1)
धीरेंद्र शास्त्रींचं नाव ऐकताच ममता कुलकर्णीचा संताप; म्हणाली, “त्याचं जितकं वय तितकी वर्षे…”, रामदेव बाबांवरही आगपाखड
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Anjali Damania Post About Dhanajay Munde
Anjali Damania : अंजली दमानियांची पोस्ट, “माझा आणि अजित पवारांचा ३६ चा आकडा आहे, पण धनंजय मुंडे….”

“माझे नाव आणि प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी मी अनेक वर्षे कठोर परिश्रम घेतले आहेत. माझे मौन हे दुर्बलतेचे नाही तर ताकदीचे लक्षण आहे. नकारात्मकता ऑनलाइन सहज पसरवली जात असताना, इतरांना पुढे घेऊन जाण्यासाठी करुणा आणि धैर्याची गरज असते”.

“मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि मा‍झ्या मूल्यांना धरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सत्य हे कोणत्याही समर्थनाशिवाय निश्चल राहते”, असेही धनश्री तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

हेही वाचा>> Video: संक्रातीच्या मुहुर्तावर सारंग-सावलीचे नाते फुलणार तर पारूवर येणार नवीन संकट, पाहा प्रोमो

नेमक काय सुरू आहे?

युजवेंद्र आणि धनश्री यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर चहलने धनश्रीबरोबरचे सर्व फोटो त्याच्या अकाऊंटवरून काढून टाकले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा आणखी वाढल्या आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र आणि धनश्री गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ‘चहल’ नाव काढून टाकले होते.

काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहलने देखील इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये क्रिकेटर म्हणाल होता की, “कठोर मेहनत लोकांचे चारित्र्य प्रकट करते. तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे. तुमची वेदना तुम्हाला माहीत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय केले हे तुम्हाला माहीत आहे. जगाला माहीत आहे. तुम्ही उच्च आहात. तुम्ही तुमच्या वडील आणि आईला अभिमान वाटावा यासाठी तू खूप घाम गाळला आहे. त्यामुळे नेहमी एका अभिमानास्पद मुलाप्रमाणे खंबीर राहा.”

Story img Loader