"फाल्गुनी पाठक यांच्या ‘मैने पायल है छनकाई’पेक्षा नेहाने..." धनश्री वर्माने केलं 'ओ सजना'चं कौतुक |Dhanashree Verma says Neha Kakkar made Falguni Pathaks Maine Payal Hai Chhankai even better | Loksatta

“फाल्गुनी पाठक यांच्या ‘मैने पायल है छनकाई’पेक्षा नेहाने…” धनश्री वर्माने केलं ‘ओ सजना’चं कौतुक

गाण्यातील मुख्य कलाकार धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा यांनी या गाण्याबद्दल प्रतिक्रिया देत कौतुक केलंय.

“फाल्गुनी पाठक यांच्या ‘मैने पायल है छनकाई’पेक्षा नेहाने…” धनश्री वर्माने केलं ‘ओ सजना’चं कौतुक
(फोटो व्हिडीओतून स्क्रीन शॉट)

गायिका नेहा कक्करचं ‘ओ सजना’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. तिने फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याचं रिक्रिएशन करत ‘ओ सजना’ गाणं बनवलंय. काहींना नेहाचं रिक्रिएटेड गाणं आवडलं आहे, तर काहींनी नेहा जुनी एव्हरग्रीन गाणी खराब करत असल्याची टीका केली आहे. नेहाचं हे गाणं ऐकल्यानंतर आपली कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा होत असल्याचं फाल्गुनी पाठक म्हणाल्या होत्या. दरम्यान, आता या गाण्यातील मुख्य कलाकार धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा यांनी या गाण्याबद्दल प्रतिक्रिया देत कौतुक केलंय. त्यांच्यामते नेहाने मूळ गाणं आणखी चांगलं केलंय.

आधी संताप, आता यु-टर्न! नेहा कक्करवर चिडलेल्या फाल्गुनी पाठक म्हणाल्या, “माझा आक्षेप नाही…”

मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत धनश्री म्हणाली, “मी फाल्गुनी पाठकचे ‘मैने पायल है छनकाई’ हे गीत ऐकत मोठी झाली आहे आणि मला ते खूप आवडते. त्यामुळे हे गाणं रिक्रिएट केल्यानंतर ते आणखी चांगलं होईल, असं मला वाटत होतं. अशातच मला या गाण्याच्या रिक्रिएशनबद्दल कळलं आणि मला खूप आनंद झाला. हे गाणं खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे त्याचं नवीन व्हर्जन लोकांना आवडेल, याची आम्हाला खात्री होती. संगीतकार नेहा, तनिष्क बागची आणि जानी यांनी ते खूप चांगलं बनवलंय. त्यांना जे करायचं होतं, त्याला त्यांनी न्याय दिलाय. मी खूप आनंदी आहे.”

“मी आज जे काही कमावलं…” ‘मैने पायल है छनकाई’च्या रिमेक वर्जनवरून ट्रोल करणाऱ्यांना नेहा कक्करचं सडेतोड उत्तर

प्रियांक शर्मा म्हणाला, “मी या गाण्याची ऑफर आल्यानंतर एका मिनिटापेक्षा कमी वेळात होकार कळवला. हे एक आयकॉनिक गाणं आहे आणि त्यांनी (नेहा आणि टीम) ते खूप चांगलं बनवलंय. त्यांनी आधीच्या व्हर्जनला पूरेपूर न्याय दिलाय. खरं तर हे गाणं तयार झाल्यानंतर नेमकं कसं असेल, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. शिवाय आमची टीम खूप चांगली होती, त्यामुळे काम करताना मजा आली. आम्ही सगळे कोरियोग्राफर बॉस्को यांचे चाहते आहोत, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणे ही खूप मोठी गोष्ट होती. मला ‘ओ सजना’ गाण्याचा एक भाग बनून खूप आनंद झाला.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“त्यावेळी दिग्दर्शकाने…” आशा पारेख यांनी सांगितले सिनेसृष्टी सोडण्यामागचे खरे कारण

संबंधित बातम्या

‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’नंतर ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजचा ट्रेलर चर्चेत; सोशल मीडियावर होतोय प्रचंड विरोध
अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
मराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा? स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”
“…म्हणून मी ‘कांतारा’सारखा चित्रपट कधीच बनवणार नाही”; ‘तुंबाड’शी तुलना झाल्यावर दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“हे अकलेचे कांदे…”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “तुमच्या तिजोरीत येणारे पैसे…”
IND vs BAN 3rd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पुण्यात ५१ पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात
‘विकी डोनर २’बद्दल आयुष्मान खुरानाचा मोठा खुलासा, म्हणाला…
“कथानकाची गरज असेल तर…” स्त्री वेश परिधान करण्याबाबत शरद पोंक्षेंचं स्पष्टीकरण, म्हणाले, “अन्यथा ते हिडीस…”