scorecardresearch

धनुषच्या चाहत्यांना आणखी एक धक्का! एक्स वाइफ ऐश्वर्यानं घेतला मोठा निर्णय

धनुषपासून वेगळ्या झालेल्या ऐश्वर्यानं आता मोठा निर्णय घेतला आहे.

dhanush, aishwarya rajinikanth, dhanush aishwarya seperation, aishwarya rajinikanth twiter, aishwarya rajinikanth instagram, धनुष, ऐश्वर्या रजनीकांत, ऐश्वर्या रजनीकांत घटस्फोट, ऐश्वर्या रजनीकांत इन्स्टाग्राम, ऐश्वर्या रजनीकांत ट्विटर
वैवाहिक नातं संपल्यानंतर धनुषची पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतनं आणखी एक निर्णय घेतला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि त्याची पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचं १८ वर्षांचं वैवाहीक आयुष्य संपवत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आपल्या या निर्णयाची माहिती या दोघांनी एक स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर करत दिली होती. आता वैवाहिक नातं संपल्यानंतर धनुषची पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतनं आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे धनुषच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वीच धनुषनं पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्याला ९ वर्षांनंतर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पुनरागमन केल्याच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली होती. त्याची ही पोस्ट बरीच चर्चेत होती. या पोस्टमध्ये धनुषनं ऐश्वर्याचा उल्लेख मैत्रीण असा केला होता. त्याच्या या पोस्टनंतर ऐश्वर्यानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये मोठा बदल केला आहे. तिनं आपल्या सोशल मीडियावर हॅन्डलवरून धनुषचं नाव काढून टाकलं आहे. धनुषच्या पोस्टनंतर ऐश्वर्यानं तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर केलेल्या या बदलामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आणखी वाचा- तब्बल ३ महिन्यांनंतर समोर आलं विकी- कतरिनाच्या लग्नाचं धक्कादायक सत्य, विवाहित असूनही…

ऐश्वर्यानं तिच्या ट्विटर हॅन्डवरून धनुषचं नाव काढून टाकत आता ते ऐश्वर्या रजनीकांत असं केलं आहे. मात्र तिचं युजरनेम अद्याप ऐश्वर्या आर धनुष असंच आहे. त्याआधी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर हॅन्डलच्या बायोमधूनही धनुषचं नाव काढून टाकलं होतं. मागच्या आठवड्यात धनुषनं ऐश्वर्याचं गाणं ‘पयानी’साठी शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्याच्या दिग्दर्शनात तयार झालेलं हे गाणं हिंदी, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित झालं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhanush ex wife aishwarya rajinikanth removed his name from social media mrj