Dhanush In Avengers Doomsday : दाक्षिणात्य सिनेमाचा स्टार धनुषने २०१३ मध्ये आलेल्या 'रांझना' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. २०२२ मध्ये त्याने 'द ग्रेमॅन' या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता धनुष 'मार्व्हल सिनेमात' रॉबर्ट डाउनी ज्युनियर बरोबर दिसणार अशी चर्चा आहे. मार्व्हल फिल्म स्टुडिओजने नुकतच 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' आणि 'अॅव्हेंजर्स: सिक्रेट वॉर' या सिनेमांची घोषणा केली आहे. याच सिनेमांतील 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' या सिनेमात धनुष रॉबर्ट डाउनी ज्युनियर बरोबर दिसणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियर हा डॉ डूमची भूमिका साकारणार असून त्याने याआधी मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील काही सिनेमांत आयर्नमॅनची भूमिका साकारून एक आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. तर धनुषने 'रांझना', 'असुरन', 'मारी' अशा एकापेक्षा भिन्न आशयाच्या सिनेमात वेगळ्या धाटणीच्या भूमिका करून चाहत्यांच्या मनात वेगळी छाप सोडली आहे. हे दोन अभिनेते, तेही मार्व्हल सिनेमात एकत्र आले तर काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हेही वाचा.Robert Downey Jr. Return To The MCU : ‘आयर्नमॅन’ म्हणजेच चाहत्यांचा लाडका रॉबर्ट डाउनी ज्युनियर मार्व्हल सिनेमात परतला; जाणून घ्या कसा 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' हा सिनेमा सुपरव्हिलनवर आधारित असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रुसो ब्रदर्स (अँथनी रुसो, जो रुसो) करणार असून त्यांनी ‘ॲव्हेंजर्स: एंड गेम’ आणि ‘ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ तसेच 'द ग्रेमॅन' या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. धनुषने २०२२ मध्ये आलेल्या रुसो ब्रदर्स दिग्दर्शित 'ग्रे मॅन' या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' मध्ये काम करण्यासाठी धनुष रुसो ब्रदर्सबरोबर बोलणी करत असल्याची चर्चा होत असल्याने चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. 'न्यूज १८' ने दिलेल्या वृत्तानुसार धनुष किंवा रुसो ब्रदर्स या दोघांनीही अद्याप कोणतेही विधान केल नसून धनुषचे चाहते त्याला रॉबर्ट डाउनी ज्युनियरच बरोबर पाहण्यास उत्सुक आहेत. Xclusive - #Dhanush Next Hollywood Film ?️ - Dhanush acted in the movie "#TheGrayMan" directed by "Russo Brothers".- This combo combines again✔️- #RussoBrothers are now in talks to rope in Dhanush for a role in "#AvengersDoomsday".- If this happens, it will definitely add… pic.twitter.com/xeLBoigNFU— Movie Tamil (@MovieTamil4) August 6, 2024 Buzz : #Dhanush to do a role in #AvengersDoomsDay directed by #RussoBrothersYour thoughts on this ? #Marvel pic.twitter.com/HxMpFgQ9VE— ٭ (@Yogace_Dfan) August 6, 2024 एक्स सोशल मीडियावर अनेक सिनेमांची माहिती देणारे पेजेस याबद्दल पोस्ट करत आहेत. 'मुव्ही तामिळ' या पेजने एक्सवर (ट्विटर) या संदर्भात पोस्ट केली असून एका चाहत्याने यावर ही बातमी खरी व्हावी यासाठी प्रार्थना करीत आहे अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे की, "मला माहिती नाही ही बातमी खरी आहे की नाही पण जर हे खरं असेल तर हे छान आहे. धनुष, तू तामिळ सिनेमाचा एक भाग आहेस याचा मला अभिमान आहे." Talks come about that #Dhanush might play a role in the upcoming Russo Brothers? #AvengersDoomsday, Dhanush had already worked in the Russo brothers' previous film #TheGrayMan. pic.twitter.com/k4m4V1b5v8— CINEMA 360 (@Cinemaa_Updates) August 6, 2024 EXCLUSIVE BUZZ:- #DHANUSH NEXT BIG STEP??? DHANUSH 3RD HOLLWOOD FILM WITH HUGE SCALE- #GREYMAN combo combines again- #RussoBrothers are now in talks to rope in Dhanush for a SPECIAL role in "#AvengersDoomsday". THIS GONNA BE BIGGER THAN EVER BEFORE#MCU #AvengersDoomsday pic.twitter.com/Id6cBEUvnA— filmrockers (@FFilmrockers) August 6, 2024 धनुष मार्व्हल सिनेमात दिसू शकतो या मुव्ही तामिळ पेजच्या पोस्टवर एका युजरची कमेंट. धनुष रॉबर्ट डाउनी ज्युनियर दिसू शकतो या 'मुव्ही तामिळ' पेजच्या पोस्टवर एका युजरची कमेंट. हेही वाचा.Bigg Boss Marathi : ‘या’ आठवड्यात नॉमिनेट झाले घरातील ‘हे’ ६ सदस्य! एका ट्विस्टमुळे झाली सर्वांची मोठी कोंडी धनुषचा 'रायन' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून धनुषने स्वतः या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याचे आगामी 'इलाईराजा' आणि 'कुबेरा' सिनेमे येणार असून 'इलाईराजा' या सिनेमात तो प्रसिद्ध संगीतकार इलाईराजा यांची भूमिका साकारणार आहे.