dharmaveer film got 7 award in fakt marathi cine samman 2022 | 'फक्त मराठी सिने सन्मान २०२२' मध्ये 'धर्मवीर' चित्रपटाला तब्बल ७ पुरस्कार | Loksatta

‘फक्त मराठी सिने सन्मान २०२२’ मध्ये ‘धर्मवीर’ चित्रपटाला तब्बल ७ पुरस्कार!

‘धर्मवीर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

‘फक्त मराठी सिने सन्मान २०२२’ मध्ये ‘धर्मवीर’ चित्रपटाला तब्बल ७ पुरस्कार!
या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने मुख्य भूमिका साकारली होती.

ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट “धर्मवीर” मुक्काम पोस्ट ठाणे…या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसमोर मांडण्यात आला होता.१३ मे ला सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम लाभल्यानंतर आता या चित्रपटावर पुरस्कारांचाही वर्षाव होऊ लागला आहे.

“फक्त मराठी सिने सन्मान २०२२” च्या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने तब्बल ७ पुरस्कार पटकावले आहेत. ज्यामध्ये सर्वात्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट लेखन प्रविण विठ्ठल तरडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रसाद ओक, सर्वोत्कृष्ट गीतलेखन मंगेश कांगणे, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे यांना मिळाले आहेत.

आणखी वाचा- ‘धर्मवीर’ला मिळाला चित्रपटसृष्टीमधील मानाचा पुरस्कार, प्रसाद ओक म्हणाला, “आनंद दिघे यांना हा पुरस्कार…”

अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने “धर्मवीर” या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

पाहा व्हिडीओ –

स्वरूप स्टुडिओजने लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहिलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे आदींच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आदित्य रॉय कपूरसोबतच्या नात्यावर अनन्या पांडेनं सोडलं मौन, म्हणाली…

संबंधित बातम्या

अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
“दोन दिवस मी पुण्यात…” अचानक लाईव्ह येण्यामागे संकर्षण कऱ्हाडेने दिलं कारण
तब्बल २० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; तिकीट फक्त ९९ रुपये
मराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा? स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
दीपिकाचा हॉट बिकिनीमधील फोटो शेअर करत शाहरुख खानने दिली ‘पठाण’बद्दल मोठी अपडेट; चाहते म्हणाले…
VIDEO: मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था म्हणजे ‘बाहेर एसी आणि आतमध्ये देशी’ – देवेंद्र फडणवीस
Jaydev Unadkat Tweet: ११ महिन्यानंतर उनाडकटचे ‘हे’ ट्विट होत आहे व्हायरल; जाणून घ्या कारण
पुणे: गोवरची साथ नियंत्रणासाठी चौथीपर्यंतच्या वर्गांना सुटी द्या; छावा मराठा संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शहरी नक्षलवाद प्रकरण : हानी बाबू यांची अंतरिम वैद्यकीय जामिनासाठी याचिका