Viral Video ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयातून आज सकाळी ७.३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला. मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी त्यांच्या निधनाच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र त्यांची मुलगी आणि अभिनेत्री इशा देओलने अफवांवर विश्वास ठेवू नका. माझे वडील धर्मेंद्र जिवंत आहेत हे स्पष्ट केलं. दरम्यान धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार आता त्यांच्या घरी केले जाणार आहेत. अशात एका व्हायरल व्हिडीओची चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ धर्मेंद्र यांच्या एका चाहत्याचा आहे. हा चाहता हातात फलक घेऊन उभा आहे असं या व्हिडीओत दिसतं.

काय आहे व्हायरल व्हडिीओत?

धर्मेंद्र यांना आज सकाळी डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांना अँब्युलन्सने त्यांच्या मुंबईतल्या घरी आणण्यात आलं. या ठिकाणी धर्मेंद्र यांच्या बंगल्याबाहेर एक चाहता आला. त्याच्या हातात धर्मेंद्र यांचा फोटो होता आणि देवा धर्मेंद्र यांना लवकर बरं कर, धर्मेंद्रजी तुम्ही लवकर बरे व्हा या आशयाचा संदेश त्याने लिहिला होता. तसंच धर्मेंद्र यांचं पोस्टर घेऊन हा चाहता त्यांच्या घराबाहेर रडत उभा होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ( Viral Video ) झाला आहे. या व्हिडीओनंतर अनेक लोक या चाहत्याचं कौतुक करत आहेत.

अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

अनेकदा भावूक झाला चाहता

धर्मेंद्र यांच्या बंगल्याबाहेर उभा असलेला हा चाहता अनेकदा भावूक झाल्याचं आणि अश्रू ढाळत उभा असल्याचं पाहण्यास ( Viral Video ) मिळालं. या चाहत्याचं म्हणणं आहे की तो लहानपणापासून धर्मेंद्र यांचे चित्रपट पाहतो. तसंच लोकांनी त्याला विनंती केल्यावर त्याने सात अजूबे इस दुनिया में हे गाणंही म्हटलं. गाणं म्हटल्यावर पुन्हा एकदा या चाहत्याला अश्रू अनावर झाले. धर्मेंद्र म्हटलं की समोर येतात त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका. सध्याच्या घडीला धर्मेंद्र यांची प्रकृती बरी नाही. मात्र आता त्यांच्यावर पुढचे उपचार त्यांच्या घरीच चालणार आहेत. ब्रीचकँडी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल ( Viral Video ) झाला आहे.

डॉ. प्रतीत समदानी यांनी काय सांगितलं?

“ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना सकाळी ७.३० ला डिस्चार्ज देण्यात आला. आता त्यांच्यावर पुढील उपचार त्यांच्या घरीच केले जातील. कारण त्यांच्या कुटुंबानेच तसा निर्णय घेतला आहे.” असं प्रतीत समदानी यांनी सांगितलं.