प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दर आठवड्याला एक नवीन पाहुणा येतो आणि शोची संपूर्ण टीम त्यांच्यासोबत मजा करत असते. या शोमध्ये पाहुणे बनून आलेल्या कलाकारांशी गप्पा मारताना न ऐकलेल्या गोष्टी देखील उघड होतात. यंदा या शोमध्ये बॉलिवूडचे दोन दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा आले आहेत. शोचे अनेक प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी धर्मेंद्र आणि शत्रुघ्न या दोघांनीही शोमध्ये कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा खुलासा केलाय. कपिल शर्माने या एपिसोडमधला एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आल्यानंतर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा ऐकून सर्व प्रेक्षक आश्चर्यचकित होत हसायला लागले. कपिल शर्माने याच एपिसोडमधला एक छोटा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा शोमध्ये शानदार एन्ट्री करतात आणि काही वेळातच नवनव्या खुलाश्यांची मालिका सुरू होते. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा धमेंद्र यांच्याबाबतीत अनेक गुपितं उघड केली आहेत. कपिल शर्मा एक प्रश्न विचारला की, “कोणती अभिनेत्री कोण-कोणते चित्रपट करतेय, याची प्रत्येक माहिती कोण घेत होतं?”. हा प्रश्न विचारल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी धर्मेंद्र यांच्याकडे इशारा केला. याचं उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “धर्मेंद्र खूपच खट्याळ आहेत…त्यांचा असा स्वभाव असून सुद्धा त्यांनी जितका आदर कमावलाय तितका आदर भल्या-भल्यांनी सुद्धा कमावला नाही.” शत्रुघ्न सिन्हा यांचं हे बोलणं ऐकून धर्मेंद्र लाजताना दिसून आले. यावर बोलताना धर्मेंद्र म्हणाले, “काही गोष्टी घडतात तर काही आपोआप जुळून येतात.”

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील मैत्रीवर कपिलने प्रश्न विचारला, यातलं रहस्य काय आहे? तुम्हा दोघांचे विचार जुळतात की तुमचा ब्रॅंड एकच आहे.” यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “अनेकदा आम्हा दोघांचे स्वभाव एकमेकांशी जुळतात. काही गोष्टी मी यांच्याकडूनच शिकलो.”

आणखी वाचा : जेव्हा गोकुळधाम सोसायटीत प्रकटले साक्षात कृष्ण…

कपिल शर्माने या दोघा अभिनेत्यांच्या धमाल मस्तीचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. “खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार.”, असं लिहित त्याने हा व्हिडीओ शेअर केलाय. ‘द कपिल शर्मा शो’चा हा प्रोमो व्हिडीओ आतापर्यंत साडेसहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. कपिल शर्माचा हा शो नुकताच पुन्हा सुरू झाला आहे. अजय देवगण शोमधला पहिला पाहुणा कलाकार बनला आणि अक्षय कुमार त्याच्या पुढच्या भागात दिसला.