scorecardresearch

जयेशभाई नाही ‘धर्मवीर’ जोरदार; बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहिली का?

बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’नं रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ला मागे टाकलं आहे.

dharmveer box office collection, dharmveer, prasad oak, jayeshbhai jordaar, ranveer singh, taran adarsh tweet, dharmveer weekend collection, धर्मवीर, प्रसाद ओक, जयेशभाई जोरदार, धर्मवीर बॉक्स ऑफिस कलेक्शन, रणवीर सिंग, तरण आदर्श ट्वीट
कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं अभिनेता रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरादार' चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एका मागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट त्यापैकीच एक आणि सध्या या चित्रपटाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. १३ मे २०२२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आठवड्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं अभिनेता रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरादार’ चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच सोशल मीडियावर चर्चेत होता. प्रसाद ओकचा लुक, चित्रपटात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका, चित्रपटातील गाणी, टीझर, ट्रेलर या सगळ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. १३ मे दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी २.५ कोटी रुपयांची दमदार कमाई करत धमाकेदार सुरुवात केली. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ४०० स्क्रिनवर दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत समीक्षक आणि अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे.

आणखी वाचा- बहुचर्चित ‘रानबाजार’ वेबसीरिजचा ट्रेलर ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.१७ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३.८६ कोटी रुपये एवढी कमाई करत आठवड्या अखेर ९.०८ कोटींचा आकडा पार केला. बजेटचा विचार करता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या जयेशभाई जोरदार या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. रणवीर सिंगच्या चित्रपटाला आठवड्याअखेर १२ कोटी रुपये एवढीच कमाई करता आली. या चित्रपटाचं बजेट ‘धर्मवीर’ पेक्षा जास्त आहे.

आणखी वाचा- न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जितेंद्र जोशी यांची सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड!

दरम्यान प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dharmveer box office collection prasad oak marathi film compite ranveer singh s jayeshbhai jordaar mrj