‘ठाण्याचा वाघ’ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत ‘माईलस्टोन’ ठरतोय. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील गायक लियो कल्याणचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

हा चित्रपट झी टॉकीजवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला मिळालेले तुफान यश साजरं करीत या अभूतपूर्व यशाला सलाम करण्याकरिता ‘धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा तयार करण्यात आली आहे. या यशोगाथेमध्ये चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कथन केले आहेत. या यशोगाथेमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचे अनुभव, पडद्यामागचे किस्से यांचा समावेश आहे.

आणखी वाचा : आलियाच्या पोस्टवर कमेंट करत ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरचं कौतुक केल्यामुळे अमृता खानविलकर झाली ट्रोल

आणखी वाचा : तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…

‘धर्मवीर’ चित्रपटासाठी केलेली अपारp मेहनत व हा चित्रपट कारकिर्दीला कसा नवं वळण देणारा ठरला हे यशोगाथेतून सांगताना, मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल असं अभिनेता प्रसाद ओक आवर्जून नमूद म्हणतो. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेला हा लोकनेता सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहे, मला आणि माझ्या भूमिकेला मिळलेलं प्रेम त्याचीच पोचपावती असल्याचं ही ते सांगतात.

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले…

‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास एका चित्रपटातून मांडणं खूप अवघड काम, पण हा सगळा घाट मी घातला आणि या कलाकृतीच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम झी स्टुडिओजने केल्याने हे शिवधनुष्य पेलल्याचे निर्माते मंगेश देसाई सांगतात. राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आणि मोलाचे सहकार्य या चित्रपटाला लाभले.

आणखी वाचा : “आयुष्यात लाईफ पार्टनर नाही आणि आता या टप्प्यावर…”, करण जोहरने व्यक्त केली खंत

संगीताच्या माध्यमातून तो काळ आणि एवढया लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा पट उलगडण्यासाठी संगीतकार म्हणून अविनाश-विश्वजीत, चिनार-महेश आणि नंदेश उमप यांनी संगीताची बाजू भक्कमपणे सांभाळली. रविवार १९ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा. ‘धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा झी टॉकीजवर अवश्य पहा.