‘गाणं ऐकून माझ्या कानातून रक्त आलं’, नव्या गाण्यामुळे ढिंच्यॅक पूजा झाली ट्रोल

ढिंच्यॅक पूजाचे ‘दिलोंका शूटर २.०’ हे नवे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

dhinchak pooja, viral video, trending, youtube, twitter memes,

२०१७मध्ये ‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यातून रातोरात प्रसिद्ध झालेली ढिंच्यॅक पूजा आता एक नवे गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या गाण्याचे नाव ‘दिलोंका शूटर २.०’ असे आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यामुळे ढिंच्यॅक पूजाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

ढिंच्यॅक पूजाचे ‘दिलोंका शूटर २.०’ हे गाणे १५ ऑक्टोबर रोजी रिलिज झाले आहे. या गाण्यामध्ये ढिंच्यॅक पूजा गाडी चालवत गाणे गाताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला देखील काही मुले गाडीवर दिसत आहेत. ‘दिलोंका शूटर है मेरा स्कूटर, मुझसा ना कोई क्यूटर’ असे या गाण्याचे बोल आहे. यूट्यूबवर हे गाणे आता पर्यंत जवळपास १ लाख ६० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.
आणखी वाचा :…अन् मालिकेच्या सेटवरच आला बिबट्या? नेमकं काय घडलं?

ढिंच्यॅक पूजाचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका यूजरने ‘ढिंच्यॅक पूजाचे गाणे ऐकून माझ्या कानातून रक्त यायला लागले’ असे म्हटले आहे.

दुसऱ्या एका यूजरने ढिंच्यॅक पूजाची गाणी ही टोनी कक्करपेक्षा चांगली असतात असे म्हटले आहे.

ढिंच्यॅक पूजा एक प्रसिद्ध युटूबवर आहे. ती आपल्या अनोख्या रॅप सॉन्गच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. ‘बापू देदे थोडा कॅश’, ‘स्वॅग वाली टोपी’, ‘होगा ना करोना’, ‘दिलोंका शूटर’ यांसारख्या अनेक गाण्यांची निर्मिती आजवर तिने केली आहे. ‘सेल्फी मैंने ले ली आज’ गाण्यामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. या गाण्यामुळे तिला चक्क बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकण्याची संधी मिळाली होती. आता तिचे ‘दिलोंका शूटर २.०’ प्रदर्शित झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dhinchak pooja drops new music video dilon ka shooter 2 0 ears are bleeding avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!