Dhirubhai Ambani International School Fees : नीता अंबानी यांची ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ ही शाळा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे, नुकताच या शाळेत भव्य असा वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव पार पडला. बॉलीवूडच्या बहुतांश सेलिब्रिटींची मुलं या शाळेत आपलं शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यामुळे, या कार्यक्रमाला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. शाहरुख व गौरी खान, करीना कपूर, सैफ अली खान, ऐश्वर्या व अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, करिश्मा कपूर, जिनिलीया व रितेश देशमुख असे बरेच सेलिब्रिटी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित होते.

मोठमोठ्या सेलिब्रिटींची मुलं ज्या शाळेत आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. त्या शाळेची फी नेमकी किती असेल? याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. २००३ मध्ये ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ ही शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेची वर्षाची फी लाखोंच्या घरात आहे. याची फी संरचना थोडक्यात जाणून घेऊयात…

dhananjay munde karuna sharma Controversy
Karuna Munde: ‘वाल्मिक कराडचा मुलगा कोट्याधीश, पण धनंजय मुंडेंचा मुलगा बेरोजगार’, करुणा मुंडेंनी मुलाबाबत का सांगितलं?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
Satyagraha for free education in Vinoba Bhaves gagode village
विनोबा भावे यांच्या गावात मोफत शिक्षणासाठी सत्याग्रह…
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
session on how to use the money collected under Ladki Bahin Yojana will be given by the government Mumbai news
‘लाडक्या बहिणीं’ना आर्थिक साक्षरतेचे धडे!

हेही वाचा : सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…

‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ या शाळेत कोणते अभ्यासक्रम आहेत?

‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ (DAIS) या शाळेची स्थापना मुकेश व नीता अंबानी यांनी २००३ मध्ये केली. जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. या शाळेत सीआयएससीई ( CISCE ), सीएआयई ( CAIE ), इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( ICSE ), इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( IGCSE ) असे शैक्षणिक बोर्ड इयत्ता दहावीपर्यंत उपलब्ध आहेत.

शाळेची फी संरचना जाणून घ्या…

११ वी आणि १२ वी साठी खास IB हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा डिप्लोमा प्रोग्राम सुद्धा शाळेत सुरू करण्यात आला आहे. या शाळेत बालवाडी ते इयत्ता १२ वी पर्यंत मुलांना जागतिक दर्जाचं शिक्षण दिलं जातं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, २०२३ ते २०२४ या अ‍ॅकेडेमिक वर्षासाठी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी बालवाडीसाठी १,४००,००० ( १४ लाख ) ते इयत्ता बारावीपर्यंत २,०००,००० ( २० लाख ) रुपये इतकी आहे. ही ट्यूशन फी असून यामध्ये पुस्तकं, स्टेशनरीसाठी लागणारा खर्च तसेच वाहतूक खर्च याचा समावेश असतो. याशिवाय पात्र विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक संधी मिळाव्यात यासाठी ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देखील प्रदान करते.

हेही वाचा : KBC 16 : अमिताभ बच्चन ATM मध्ये कधीच गेले नाहीत, जया बच्चन यांच्याकडून घेतात पैसे, म्हणाले…

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन, शाहरुख व गौरी खान यांचा मुलगा अबराम, सैफ-करीनाचा मुलगा तैमूर अली खान व जेह ही सगळी मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत. यापूर्वी जान्हवी कपूर, सुहाना खान, खुशी कपूर, इब्राहिम अली खान, आर्यन खान, सारा तेंडुलकर, न्यासा देवगन आणि अनन्या पांडे या स्टार किड्सनी सुद्धा देखील याच शाळेतून त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.

Story img Loader