Dhruvi Patel Miss India Worldwide 2024 : अमेरिकेतील कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिमची विद्यार्थिनी ध्रुवी पटेल हिने ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’चा खिताब पटकावला आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइड ही भारताबाहेर घेतली जाणारी व तीन दशकांहून अधिक काळापासून चालत आलेली भारतीय सौंदर्य स्पर्धा आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइडचा मुकूट परिधान केल्यानंतर ध्रुवीने बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची व यूनिसेफची राजदूत बनण्याची इच्छा व्यक्त केली. न्यू जर्सीमधील एडिसन येथे पार पडलेल्या मिस इंडिया वर्ल्डवाइडच्या अंतिम फेरीत ध्रुवीला विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर ध्रुवीने एकच जल्लोष केला.

मिस इंडिया वर्ल्डवाइडचा मुकूट परिधान केल्यानंतर धृवी म्हणाली, “मिस इंडिया वर्ल्डवाइडचा खिताब जिंकणं हा एक अविश्वसनीय सन्मान आहे. हा मुकूट आयुष्यातील इतर सर्व उबलब्धींपेक्षा मोठा आहे. हा एक मोठा वारसा आहे, यामुळे जागतिक स्तरावर इतरांना प्रेरणा मिळत राहील”.

brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Shikhar Dhawan Spotted With Mystery Girl At Airport Avoids Sharing Frames Video Goes Viral
Shikhar Dhawan Video: घटस्फोटानंतर शिखर धवन पुन्हा प्रेमात? मिस्ट्री गर्लबरोबरचा Video होतोय व्हायरल, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
leopard trapped Surgana Taluka Avalpada,
आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त
After threat to UP CM Yogi Adityanath Mumbai Police received another threat message
योगींचा मृत्यू बाबा सिद्दीकीसारखा झाला, तर भारताची अवस्था हमास, इस्त्राईलसारखी आणखी एक धमकीचा संदेश
loksatta readers feedback
लोकमानस: अर्थकारणाच्या विकेंद्रीकरणातून ‘संघराज्य’
Praful Patel criticized Raj Thackeray for his statement
अजून मूल जन्माला आलं नाही, त्याआधीच त्याचं साक्षगंध, लग्न…, खा. प्रफुल्ल पटेल यांचा ‘यांना’ टोला
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
Dhruvi Patel
(PC : Dhruvi Patel Insta)

सूरीनामची लिसा अब्दोलहक ही या स्पर्धेतील पहिली रनर-अप ठरली आहे. तर नीदरलँडची मालविका शर्मा हिला दुसरी रनर-अप म्हणून घोषित करण्यात आलं.

Dhruvi Patel
(PC : Dhruvi Patel Insta)

हे ही वाचा >> सई ताम्हणकरला आवडला ‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ सदस्याचा स्वभाव, निक्की तांबोळीचा उल्लेख करत म्हणाली…

मिसेस श्रेणीत सुआन मॉटेट तर मिस टीन इंडिया वर्ल्डवाइडचा खिताब सिएरा सुरेटने पटकावला

मिसेस श्रेणीत त्रिनिदाद आणि टोबॅगोची सुआन मॉटेट विजेती ठरली तर स्नेहा नांबियार पहिली रनर-अप आणि युनायटेड किंगडमची पवनदीप कौर दुसरी रनर-अप ठरली. किशोर श्रेणीमध्ये ग्वाडेलोपची सिएरा सुरेट हिने मिस टीन इंडिया वर्ल्डवाइडचा मुकूट मिळवला. नीदरलँडची श्रेया सिंह आणि सूरनामची श्रद्धा टेडजो या दोघींना अनुक्रमे पहिली व दुसरी रनर-अप म्हणून घोषित करण्यात आलं.