सध्या सिनेमागृहांमध्ये आदित्य धरच्या ‘धुरंधर २’ची चर्चा सुरू आहे. रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात बॉलीवूडमधील इतरही काही कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. ‘धुरंधर २’ एक गुप्तहेरपट आहे. अॅक्शन व थ्रिलरनं भरलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे.
‘धुरंधर’ व ‘धुरंधर २’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर २’ पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्यनं गर्दी करीत आहेत. एरवी प्रेक्षक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला की, ओटीटीवर तो कधी येणार याची वाट पाहत असतात. पण तुम्ही जर ‘धुरंधर २’ ओटीटीवर येण्याची वाट पाहत असाल, तर माहितीसाठी सांगतो ‘धुरंधर २’ इतक्यात तरी ओटीटीवर येणार नाहीये. प्रेक्षकांमध्ये असलेली चित्रपटाबद्दलची क्रेझ पाहता, अजून बरेच दिवस चित्रपटगृहांत सिनेमाचे शो सुरू राहणार आहेत. पण, जर तुम्हाला घरबसल्या स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट पाहायचा असेल, तर आम्ही तुम्हाला एका चित्रपटाची माहिती देणार आहोत.
जर तुम्हालासुद्धा स्पाय थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर आम्ही तुम्हाला एका चित्रपटाबद्दलची माहिती देणार आहोत जो ‘धुरंधर’सारखाच आहे. या चित्रपटाची कथा शेवटपर्यंत खेळवून ठेवते. महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपटातील प्रत्येक सीनमध्ये रहस्य आहे. या चित्रपटाचं नाव, कथा आणि तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
चित्रपटाचं नाव काय?
२ तास ४० मिनिटांचा हा स्पाय थ्रिलर चित्रपट २०२५ मध्येच रिलीज झाला होता, जो क्लेबर मेंडोंका यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात वैगनर मौरा मुख्य भूमिकेत आहेत. ‘द सीक्रेट एजेंट’, असं या चित्रपटाचं नाव आहे.
‘द सीक्रेट एजंट’ची कथा काय?
‘द सीक्रेट एजंट’ची कथा मार्सेलो नावाच्या एका प्राध्यापकाभोवती फिरते, जो अचानक राजकीय गोष्टींमध्ये अडकतो आणि जीव वाचवण्यासाठी गुप्त एजंटसारखा लपून राहत असतो. त्यामध्ये ७० च्या दशकातील लूक, फॅशन व म्युझिक पाहायला मिळत आहे, ज्यामुळे चित्रपट अजून खास ठरतो. कथेत थ्रिलर, सस्पेन्स आणि राजकीय घडामोडी पाहायला मिळतात.
ओटीटीवर कुठे पाहू शकता ‘द सीक्रेट एजेंट’
हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी चॅनेलवर पाहू शकता. आयएमडीबीने या चित्रपटाला ७.२ इतकी रेटिंग दिली आहे. त्याशिवाय या चित्रपटाला ९८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ४ नामांकने मिळाली.
