“दिवंगत वडिलांच्या सर्व गोष्टी सावत्र भावाला मिळाल्या, पण मला…”; दिया मिर्झाने व्यक्त केली खंत

दिया मिर्झाचे नाव नेहमीच बॉलिवूडमधील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जाते.

dia-mirza
(Photo-Instaram@diamirza)

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. दिया मिर्झाचे नाव नेहमीच बॉलिवूडमधील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जाते. मात्र दिया लहान असताना तिला कुटुंबातील बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. नुकतंच एका मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला आहे. “मला माझ्या दिवंगत वडिलांच्या घरातील माझ्याशी संबंधित काही गोष्टी हव्या होत्या. मात्र त्यांनी त्या मला न देता सर्व गोष्टी माझ्या सावत्र भावाला दिल्या,” अशी खंत दियाने या मुलाखतीत व्यक्त केली.

दिया केवळ ९ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. दियाच्या वडिलांचे नाव फ्रँक हैंड्रिच असे असून ते एक जर्मन कलाकार होते. तर दियाची आई दिपा या इंटिरिअर डिझायनर होत्या. दियाची आई आणि वडिलांचे वैवाहिक जीवन फार गुंतागुंतीचे झाले होते. त्यामुळे दिया फक्त ५ वर्षाची असताना त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिचे वडील म्हणजेच फ्रँक यांनी दुसरे लग्न केले. तर दिपानेही हैद्राबादमधील अहमद मिर्झा यांच्यासोबत दुसरे लग्न केले. सध्या दिया ही त्यांचेच आडनाव लावते.

नुकतंच दिया मिर्झाने हार्पर बाजार या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या बायोलॉजिकल वडिलांबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. या मुलाखतीत तिने म्हटले की, मला माझ्या वडिलांच्या संपत्तीतील काही गोष्टी हव्या होत्या. पण त्या सर्व गोष्टी माझ्या सावत्र भावाला मिळाल्या. माझ्या सावत्र भावाचा जन्म वडिलांच्या मृत्यूनतंर झाला. तरी देखील त्याला सर्व गोष्टी मिळाल्या होत्या, अशी खंत दियाने व्यक्त केली.

“काही वर्षांपूर्वी जेव्हा माझा सावत्र भाऊ मला आणि माझ्या आईला भेटायला मुंबईला आला होता. त्यावेळी मी त्याला घर दाखवत होते. घर दाखवत असताना तो कॉरिडॉरकडे गेला. त्याठिकाणी मी अनेक छायाचित्र लावली होती. त्यात माझ्या लहानपणी पालकांसोबत काढलेला एक फोटोही होता. तो फोटो पाहिल्यानंतर त्याच क्षणी माझ्या लक्षात आले की, माझ्या वडिलांच्या ज्या गोष्टींवरुन मी इतकी वर्ष दु:ख सहन करत बसली होती, त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे आहे. त्यांच्या माझ्याकडे असलेल्या आठवणी ही माझ्याकडे असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. याची जाणीव मला त्यावेळी झाली,” असे तिने सांगितले.

गरोदरपणात दिया मिर्झा कशी झाली जखमी? , चाहत्यांच्या प्रश्नावर दियाने दिलं उत्तर

विशेष म्हणजे २०१८ मध्ये दिया तिच्या वडीलांच्या कुटुंबाला भेटण्यासाठीही गेली होती. त्यावेळीचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. दियाने यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्न गाठ बांधली. या दोघांचे हे दुसरे लग्न होते. अव्यान हा दियाचा पहिला मुलगा आहे. तर, वैभवची समायरा ही मुलगी आहे. दिया ‘थप्पड’ या चित्रपटात दिसली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dia mirza emotional revealed how she wanted to have some of her late father belongings nrp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या