scorecardresearch

दिया मिर्झाला मिळाला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते सन्मान

सोशल मीडियावरूनदेखील दिया पर्यावरण विषय जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.

दिया मिर्झाला मिळाला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते सन्मान
(Photo-Instaram@diamirza)

अभिनेत्री दिया मिर्झाला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड’ने गौरविण्यात आलंय. पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी दियाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. ३० सप्टेंबरला मुंबईतील ताज महाल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात दियाला महाराष्ट्राचे गव्हर्नर भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार तिला देण्यात आलाय.

भारत सरकारच्या इंटरॅक्टीव फोरम ऑन इंडियन इकॉनमी संस्थेच्या वतीने दिया मिर्झाला हा पुरस्कार देण्यात आलाय. या पुरस्कार सोहळ्यातील दिया मिर्झाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

KBC 13: जेव्हा बिग बींना विनातिकीट प्रवास करताना टीसीने पकडलं; शेअर केला धमाल किस्सा


२०१७ सालामध्ये दिया मिर्झाची संयुक्त राष्ट्र पर्यावरण सद्भावना राजदूत म्हणून निवड झाली आहे. या पदी तिचा कार्यकाळ २०२२ सालापर्यंत वाढवण्यात आलाय. पर्यावरण संरक्षण आणि संबंधित समस्यांवर जागरूकता पसरवण्याचं काम ती करते. समाज हितासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध क्षेत्रातील ११५ लोकांची ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

सोशल मीडियावरूनदेखील दिया पर्यावरण विषय जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dia mirza get award champions of change by governor of maharashtra bhagat singh koshiyari kpw

ताज्या बातम्या