“लग्नापूर्वीच गरोदर असणं म्हणजे…”; अभिनेत्री दिया मिर्झाचं वक्तव्य चर्चेत

लग्नापूर्वी गरोदर असणं कितपत योग्य आहे? याबाबत दिया मिर्झाने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

Dia Mirza Dia Mirza on before wedding pregnancy
लग्नापूर्वी गरोदर असणं कितपत योग्य आहे? याबाबत दिया मिर्झाने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

अभिनेत्री दिया मिर्झाचं (Dia Mirza) खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. लग्नापूर्वीच दिया गरोदर राहिली. आपण गरोदर असल्याचं कळताच दियाने वैभव रेखी याच्याशी लग्नगाठ बांधली. फक्त दियाच नव्हे तर बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींच्या बाबतीत देखील असंच घडताना दिसलं. पण लग्नापूर्वीच गरोदर असणं कितपत योग्य आहे? याबाबत दियाने स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे. अभिनेत्री आलिया भट्ट लग्नाच्या २ महिन्यानंतर गरोदर असल्याचं कळताच दिया याविषयावर बोलली.

आणखी वाचा – “प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना…”; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

नेमकं काय म्हणाली दिया मिर्झा?
दियाने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये लग्नापूर्वीच गरोदर असण्यावर आपलं मत मांडलं. याबाबत बोलताना ती म्हणाली. “आपल्या समाजामध्ये बरेच लोक असे आहेत की लग्नापूर्वी सेक्स आणि गरोदर असणं याकडे विचित्र नजरेने पाहतात. पण काही लोक असेही आहेत की ज्यांना या गोष्टी आपल्या आवडीनुसार करायला आवडतात. लग्नापूर्वीच सेक्स किंवा गरोदर असणं ही प्रत्येकाची निवड आहे. आपण मनमोकळ्य विचारांचे आहोत असे समाजामध्ये वावरणाऱ्या काही लोकांना वाटतं. पण प्रत्यक्षात तसं काहीच नसतं.”

दियाच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. आपल्या खासगी आयुष्याबाबत प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि तो घेतला पाहिजे असं दियाचं म्हणणं आहे. दियाने देखील तिच्या खासगी आयुष्यामध्ये तेच केलं. आपल्या आयुष्याबाबत तिने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बिनधास्त मुलगी वनिता खरातचे आजवरचे सर्वात बोल्ड लूक

२०२१मध्ये दियाने व्यावसायिक वैभव रेखीशी लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यानंतरच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. लग्नानंतर काही दिवसांनी आपण गरोदर असल्याचं दियाने सोशल मीडियाद्वारे सांगितलं. यामुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत तिने आपल्या आयुष्यामधील प्रत्येक क्षण हे एण्जॉय केले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dia mirza talk about sex and pregnancy before marriage personal choice her statement viral on social media kmd

Next Story
“माझ्या फेसबुकवर फारच अश्लील फोटो…”, संतोष जुवेकरचे फेसबुक अकाऊंट हॅक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी