बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री डायना पेंटी तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अभिनेत्री डायना तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या सुंदर फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत येत असते. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री डायने पेंटी पुन्हा एकदा खास कारणामुळे चर्चेत आलीय. डायना पेंटी सध्या हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आहे. अभिनेत्री डायनाने तिथे भारताचा झेंडा फडकावल्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरूय. बुडापेस्टमध्ये भारताचा तिरंगा फडकावल्याचा तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय.
‘कॉकटेल’ चित्रपटातून लाइमलाइटमध्ये आलेली अभिनेत्री डायना पेंटी गेल्या अनेक दिवसांपासून बुडापेस्टमध्ये आहे. तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती हंगेरीमधल्या बुडापेस्टमध्ये राहत आहे. आजच्या दिवशी तिला भारतात राहून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करता आला नाही. तरीही तिने विदेशात भारताचा झेंडा फडकावून आजचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केलाय. याचा एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ती आपल्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलवत भारताचा झेंडा फडकवताना दिसून येतेय. हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “घरापासून दूर आहे…तरीही आजच्या दिवशी मला रहावलं नाही…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!” असं लिहित तिने हा व्हिडीओ शेअर केलाय.
View this post on Instagram
अभिनेत्री डायना पेंटी हिने विदेशात राहूनही भारताचा झेंडा अगदी डौलानं फडकावल्याबद्दल सोशल मीडियावर तिचं बरंच कौतुक होताना दिसतंय. तिने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. स्वातंत्र्यदिन म्हणजे सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करणाऱ्यांसमोर अभिनेत्री डायना पेंटीनं एक उत्तम उदाहरण सादर केलंय. विदेशात आपल्या भारताचा झेंडा डौलानं फडकत असल्याचं पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा स्पष्टपणे झळकताना दिसून आला.
अभिनेत्री डायने पेंटीच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं तर तिने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता सैफ अली खान हे सुद्धा झळकले होते. त्यानंतर ४ वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर ती ‘हॅप्पी भाग जाएगी’ या चित्रपटातून पुन्हा दमदार एन्ट्री केली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. त्यानंतर ती ‘लखनऊ सेंट्रल’, ‘परमाणुः द स्टोरी ऑफ पोखरण’ आणि ‘खानदानी शफाखाना’ सारख्या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या समोर आली.