हॅण्डसम टायगरला हिरोइन मिळेना

अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी पाठ फिरवली आहे.

टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘बागी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्यानंतर लगेचच सिक्वलची घोषणा झाली. ‘बागी २’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीदेखील तयारी झाली. ‘बागी ३’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात टायगर मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याला या चित्रपटासाठी अभिनेत्रीच मिळत नसल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘बागी ३’ चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील नायिकेविषयीच्या अनेक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री दिशा पटानी टायगरसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अचानक श्रद्धा कपूरचं नाव समोर आलं. त्यामुळे नक्की कोणत्या अभिनेत्रीची या चित्रपटात वर्णी लागणार हा प्रश्न साऱ्यांना पडला होता. हा गुंता सुटत नाही तर त्यात अभिनेत्री सारा अली खानचं नाव समोर आलं. ‘केदारनाथ’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सारा टायगर श्रॉफसोबत झळकणार असल्याची नवी चर्चा रंगली. मात्र ही चर्चादेखील निष्फळ ठरली.

‘बागी ३’साठी दिशा, श्रद्धा आणि सारा या तिन्ही अभिनेत्रींच्या नावाची चर्चा रंगली मात्र या साऱ्या अफवा निघाल्या. त्यामुळे ‘बागी ३’मध्ये नक्की कोणती अभिनेत्री झळकणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये केवळ टायगर एकटाच मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक दिग्गज अभिनेत्रींनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. मुख्य भूमिका मिळत नसल्यामुळेच सारानेदेखील चित्रपटासाठी नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या टायगरला कोणतीही हिरोइन मिळत नाहीये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Did sara ali khan reject tiger shroffs baaghi 3 shraddha kapoor disha patani in the running

ताज्या बातम्या