scorecardresearch

DID Super Moms : ७६ वर्षीय मराठमोळ्या आजींचा भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

या आजीचा डान्स करतानाचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असाच आहे.

did super moms, 76 years old women amezing dance, laxmi ajji dance, remo dsouza, bhagyashree, urmila matondkar, डीआयडी सुपरमॉम, लक्ष्मी आजी डान्स, रेमो डिसुझा, भाग्यश्री, उर्मिला मातोंडकर
आजींचा हा भन्नट डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. टीव्हीवर अनेक डान्स रिअलिटी शो लोकप्रिय होताना दिसतात. अलिकडेच झी टीव्हीवर ‘डीआयडी सुपरमॉम’चं नवं पर्व सुरू झालं आहे. ज्यात महिला स्पर्धक आपल्या डान्स परफॉर्मन्सनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेताना दिसत आहेत. मात्र या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. कारण या शोमध्ये ७६ वर्षांच्या मराठमोळ्या आजींनी डान्स करत सर्वांनाच चकीत केलं आहे. आजींचा हा भन्नट डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

‘डान्स इंडिया डान्स’च्या मंचावर नुकतीच एका आजींनी हजेरी लावली. लक्ष्मी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचा ‘डीआयडी’च्या मंचावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडओमध्ये या आजी परीक्षक रेमो डिसुझा, उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री यांच्यासोबत धम्माल डान्स करताना दिसत आहेत. ७६ वर्षीय या आजींचा डान्स पाहून प्रेक्षकांसोबत परीक्षकही भारावून गेलेले दिसत आहे.

आणखी वाचा- Ananya Trailer : “तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे…” जगण्याला नवी दिशा देणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर प्रदर्शित

लक्ष्मी आजींनी ‘झिंगाट’ गाण्यावर भन्नाट डान्स केला. पण यासोबत त्यांनी ‘सौदा खरा खरा’ या पंजाबी गाण्यावर भांडगा देखील केला. या आजींच्या धम्माल डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आजींचा डान्स करतानाचा उत्साह आजकालच्या तरुणाईलाही लाजवेल असाच आहे. परीक्षकांसोबत डान्स केल्यानंतर या आजींनी तिन्ही परीक्षकांना मिठाईसाठी १०-१० रुपये दिले. धम्माल डान्स करून सर्वांनाच आश्चर्यचकीत करणाऱ्या या आजींचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Did super moms 76 years old women amazing dance watch video mrj

ताज्या बातम्या