“मला पॉर्नस्टार व्हायचे होते…”, शाहरुख खानने केला होता खुलासा

शाहरुखने एका जुन्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे.

shahrukh khan,, pornstar,
शाहरुखने एका जुन्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्यांच्या चित्रपटामुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत असतो. शाहरूखने त्याच्या करिअरची सुरुवात ही मालिकांपासून केली होती. आज सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या शाहरुखने ९ वर्षांपूर्वी पॉर्नस्टार होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

शाहरुखने २०१३ साली एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने ९ वर्षांपूर्वी पॉर्नस्टार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. “मला नेहमीच पॉर्नस्टार बनायची इच्छा होती. मी पॉर्नस्टार होण्यासाठी सकारात्मकदृष्टा काम केले असते,” असे शाहरुख म्हणाला.

आणखी वाचा : “शूटिंग दरम्यान अनोळखी व्यक्तिने २१ लाख रुपये देऊ केले तर…”, प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

आणखी वाचा : अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी नवीन घरात केला गृह प्रवेश, पाहा फोटो

पुढे त्याला ही इच्छा कशी झाली याविषयी बोलताना शाहरुख म्हणाला, “मी सिल्वेस्टर स्टॅलोनचा खूप मोठा फॅन आहे. जो हॉलिवूड सुपरस्टार होण्याआधी एक पॉर्नस्टार होता. मी जगातील सर्वात मोठा पॉर्नस्टार झाल्यानंतर अमेरिकेत माझ्या देशाचा झेंडा फडकवला असता.”

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

कोण आहे सिल्वेस्टर स्टॅलोन…

सिल्वेस्टर स्टॅलोन हा असा हॉलिवूड अभिनेता होता ज्याने अनेक कलाकारांना प्रेरणा दिली आहे. शाहरुख देखील त्याच्यामुळे प्रेरित झाला होता. सिल्वेस्टरला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, पण त्याच्या जन्माच्या वेळी असे काही झाले की त्याचा अर्धा चेहरा हा पॅरालाइज झाला. त्याला बोलताना त्रास व्हायचा. त्याने १९७० साली पहिल्या अडल्ट चित्रपटात काम केले होते. राहत असलेल्या अपार्टमेंटमधून काढून टाकल्यामुळे सिल्वेस्टरला अडल्ट चित्रपटात काम करावे लागले होते. संघर्ष केल्यानंतर ‘रॉकी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यानंतर त्याने कधी पाठीमागे वळून पाहिले नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Did you know shah rukh khan once said he wanted to be a porn star dcp

Next Story
“…अन् मी तब्बल १६ तास झोपले”, अभिनेत्री हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
फोटो गॅलरी