“मला भिकारी समजून एकाने दिले पैसे”; सारा अली खानने सांगितला ‘तो’ प्रसंग

कुटुंबीयांसोबत सुट्टीवर गेली असताना हा प्रसंग घडल्याचं तिने सांगितलं.

sara-ali-khan-
सारा अली खान

लहानपणी रस्त्यावर आपल्याच धुंदीत नाचत असताना एकाने भिकारी समजून पैसे दिल्याचा किस्सा अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखतीत सांगितला होता. कुटुंबीयांसोबत सुट्टीवर गेली असताना हा प्रसंग घडल्याचं तिने सांगितलं. त्यावेळी सैफ अली खान आणि अमृता सिंह एका दुकानात खरेदीसाठी गेले होते. तर सारा आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान त्या दुकानाच्या बाहेर उभे होते.

“दुकानाबाहेर उभी असताना मी आपल्याच धुंदीत नाचण्यात मग्न होते. मला तसं नाचताना पाहून लोकांना वाटलं असावं की मी गरीब असून पैशांसाठी तसं रस्त्यावर नाचत आहे. त्यामुळे मला त्यांनी पैसेसुद्धा दिले. माझा डान्स चांगला होता आणि त्यांना मी क्यूट वाटले असणार म्हणून पैसे दिले असावे असा विचार मी करत होते. त्यामुळे त्यांनी दिलेले पैसे मी स्वत:कडेच ठेवले,” असं साराने त्या मुलाखतीत सांगितलं होतं.

आणखी वाचा : धक्कादायक! ‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवरील २२ जणांना करोनाची लागण

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच सारा अली खान बिनधास्त आणि स्पष्टवक्ती असल्याचं पाहायला मिळालं. अनेक मुलाखतींमध्ये साराचा स्पष्टवक्तेपणा पाहायला मिळाला. ‘सिम्बा’मधील भूमिकेसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्याकडे विनंती केल्याचंही साराने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तर स्टारकिड असूनही साराला अजिबात गर्व नसल्याचं रोहित शेट्टीने नंतर एका रिअॅलिटी शोमध्ये बोलून दाखवलं. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. यामध्ये ती वरुण धवनसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Did you know that sara ali khan was once mistaken for a beggar as a child ssv

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या