अभिनेता शाहरुख खानच्या रईस या चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शाहरुखच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सोशल मीडियावरही या ट्रेलरचीच चर्चा सुरु होती. पण, विविध युट्यूब चॅनल्सच्या नजरेतून ‘रईस’चा ट्रेलरही वाचलेला नाही. एखाद्या गोष्टीला कल्पनाशक्तीची जोड देऊन त्याचा संबंध नानाविध गोष्टींशी लावण्याचा हल्ली ट्रेंडच आला आहे. मूळ गोष्टीला स्वत:च्या कलात्मकतेचा तडका मारत काही तरी वेगळे करत ती गोष्ट अधिकच रंजक बनवली जाते आणि त्याला मॅश-अपचं नावही दिले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंग खानच्या ‘रईस’च्या ट्रेलरचेही असेच काहीसे करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर दाखल झाल्यापासून आतापर्यंत चाहत्यांनी त्याचे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनल मेस्सी आणि बॅटमॅन-जोकर अशा विविध प्रकारे मॅश-अप केले आहे. त्यामुळे आता ‘रईस’च्या ट्रेलरचे हे व्हर्जनही चांगलेच गाजत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे संवाद शाहरुख आणि माहिरा म्हणताना दिसतात तेच या मॅश-अप ट्रेलरमध्ये या संवादांच्या वेळी धोनी, विराट, मेस्सी दिसत आहेत. असेही म्हटले जात आहे की शाहरुखच्या या चित्रपटाच्याच ट्रेलरचे आतापर्यंत सर्वात जास्त मॅश-अप करण्यात आले आहेत.

वाचा: शाहरुख-माहिराचा ‘रोमान्स’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का?

दरम्यान, ‘रईस’ या चित्रपटातून शाहरुख खान एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘रईस’ हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different versions of shah rukh khans raees trailer
First published on: 07-01-2017 at 17:33 IST