scorecardresearch

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता साकारणार नजरेत विखार असणारा अफजलखान; ‘शेर शिवराज’चे नवे पोस्टर प्रदर्शित

नुकतंच या चित्रपटातील अफजलखानाचा पहिला लूक समोर आला आहे.

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकतंच या चित्रपटातील अफजलखानाचा पहिला लूक समोर आला आहे.

दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील चौथा चित्रपट शेर शिवराज हा चित्रपट येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतंच अभिनेता चिन्मय मांडेलकरने या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरद्वारे अफजलखानाचा पहिला लूक समोर आला आहे.

“जावळीच्या जंगलाचा राजा एकच…”, अंगावर शहारा आणणारं ‘शेर शिवराज’चे नवं पोस्टर पाहिलंत का?

‘श्री शिवराज अष्टक’ मधील इतर चित्रपटाप्रमाणे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर साकारत आहे. तर नजरेत विखार असणाऱ्या अफजलखानाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील विविध खलनायकांची नाव यासाठी चर्चेत होती. मात्र यातील नेमकं कोण अफजलखानाची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर त्याचं उत्तर समोर आलं आहे.

चिन्मय मांडलेकरने शेअर केलेल्या या नव्या पोस्टरमध्ये स्वत: चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसत आहे. त्यासोबतच जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी दिसत आहेत. तसेच या नव्या पोस्टरमध्ये अफजल खानाची झलक पाहायला मिळत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी आहे. त्याने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात खलनायकांच्या भूमिका साकारल्या आहेत.

अहोरात्र अन्याय-अत्याचार सहन करत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला…दाही दिशा थरथरल्या, काळ पुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि प्रचंड गर्जना करत प्रकटला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह…..’शेर शिवराज’ २२ एप्रिल २०२२, असे कॅप्शन चिन्मयने हे पोस्टर शेअर करताना दिले आहे. दरम्यान चिन्मयची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Video : “खंडोबाच्या खंड्या जैशी ज्याची हाय तलवार…”, पाय थिरकायला लावणारं ‘शेर शिवराज’चे पहिले गाणे पाहिलंत का?

दरम्यान काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं ‘येळकोट देवाचा’ प्रदर्शित झालं होतं. ‘यळकोट देवाचा’ हे गाणे दिग्पाल लांजेकर यांनी स्वत: लिहिलेले आहे. तर या गाण्याला आदर्श शिंदे आणि जुईली जोगळेकर या स्वरबद्ध केले आहे. या गाण्यात चिन्मय मंडलेकर, मृण्मयी देशपांडे, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, विक्रम गायकवाड, सचिन देशपांडे यांसारखे अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Digpal lanjekar sher shivraj movie new poster reveled afzal khan role play by this bollywood actor nrp

ताज्या बातम्या