दिलीप कुमार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत

बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणजेच दिलीप कुमार यांचा आज ९५वा वाढदिवस आहे.

दिलीप कुमार, सायरा बानू

बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणजेच दिलीप कुमार यांचा आज ९५वा वाढदिवस आहे. पण, अलीकडेच न्यूमोनियातून बरे झालेले दिलीप कुमार यंदा त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. डॉक्टरांनी त्यांना कोणताही संसर्ग होऊ न देण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याची माहिती सायरा बानू यांनी दिली.

‘दिलीप साहेबांच्या वाढदिवशी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे त्यांना भेटायला येतात. पण त्यांना जंतूसंसर्ग (इन्फेक्शन ) होऊ नये म्हणून आज आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाही.’, असे सायराजी म्हणाल्या. यावेळी त्यांनी दिलीप यांच्या आत्मचरित्रातील एका वाक्याचीही आठवण करून दिली. ‘अनोळखी लोक भेटून सांगतात की त्यांना माझं काम किती आवडतं, तेव्हा ती शाबासकी मला पुरस्कारापेक्षा मोठी असते.’

दिलीप कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या चाहत्यांना त्यांची भेट घेण्याची संधी मिळणार होती. आजच्या दिवशी त्यांचं घर नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासाठी खुलं असतं. त्यासाठी ओपन हाऊस ठेवण्यात आल्याचे वृत्त काल होते. मात्र, सायरा बानू यांनी दिलेल्या माहितीमुळे आता कोणालाच त्यांना भेटता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dilip kumar birthday dilip saab is not celebrating his birthday this year says saira banu

ताज्या बातम्या