लेखनामध्ये असो की अभिनयामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याला प्राधान्य देणारे अष्टपैलू रंगकर्मी दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा काही तरी नवीन करायला जात आहेत. विशेष म्हणजे प्रभावळकर पहिल्यांदा असं काही करणार आहेत जे त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये कधीच केलं नव्हतं. आता अनेकांना प्रश्न पडू शकतो की रंगभूमीवर बालनाट्यांपासून ते एकपात्री प्रयोगांपर्यंत आणि मालिकांपासून ते सिनेमांपर्यंत सर्व माध्यमांमध्ये आपली छाप पाडलेल्या प्रभावळकरांनी असं काय बरं केलं नसेल जे आता करत आहेत.

रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये होणार प्रयोग

दिलीप प्रभावळकर पहिल्यांदा इंटरनॅशनल आदित्य बिर्ला सेंटर परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सादरीकरण करणार आहे. त्यांच्या बहुचर्चित पत्रापत्री या अभिवाचनाचा प्रयोग ९ नोव्हेंबर रोजी ऑपेरा हाऊसमध्ये होणार आहे. आतापर्यंत देश- परदेशातील अनेक थिएटरमध्ये सादरीकरण केलेल्या प्रभावळकरांनी याआधी कधीही ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये सादरीकरण केले नव्हते. त्यामुळे या प्रयोगासाठी ते स्वतः फार उत्सुक आहेत.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Kannada film director Guru Prasad Found Dead
कुजलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह, दुर्गंधीमुळे घटना उघडकीस, पोलिसांची प्रतिक्रिया आली समोर
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी

९ नोव्हेंबरच्या प्रयोगासाठी मी उत्सुक आहे

आगामी प्रयोगाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘पत्रापत्रीचे आतापर्यंत २५ प्रयोग झाले आणि येत्या ९ नोव्हेंबरला ऑपेरा हाऊसला प्रयोग आहे. ऑपेराच्या प्रयोगासाठी मी फार उत्सुक आहे. कारण मी यापूर्वी कधीच तिथे प्रयोग केले नाही. त्या वास्तुला एक ऐतिहासिक महत्त्व तर आहेच शिवाय एक परंपराही आहे. त्यामुळेच त्या दिवसाचा प्रयोग मला खूप समाधान देऊन जाईल हे निश्चित आहे. रंगभूमीवरील एका वेगळ्या प्रकारासाठी आणि वेगळ्या अनुभवासाठी सर्वांनी पत्रापत्री पाहायला हवं हे मी आवर्जुन सांगेन.’

दिलीप प्रभावळकर काय म्हणाले?

पत्रापत्रीबद्दल बोलताना प्रभावळकर म्हणाले की, ‘वाचन संस्कृतीला स्वतःचं असं महत्त्व आहे. पत्रातून व्यक्त होताना विचारांची देवाण- घेवाण तर होतेच शिवाय एक अंतरीचा संवादही होतो. हा अनुभव जर कोणाला घ्यायचा असेल तर पत्रापत्री पाहावं लागेल. विशेष म्हणजे पत्रापत्रीमध्ये अभिवाचन केली जाणारी पत्रं ही प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीची आहेत. वर्तमानकाळातही तेव्हा लिहिलेली पत्रं चपखल बसतात ही या पत्रापत्रीची जमेची बाजू आहे.’ बदाम राजा प्रोडक्शन्स निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित पत्रापत्रीमध्ये एकूण पाच पत्रांचे अभिवाचन आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. यात तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा असून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करतात.

विजय केंकरेंचीही महत्त्वाची भूमिका

आतापर्यंत १०० हून अधिक नाटकांचं दिग्दर्शन केलेल्या विजय केंकरे यांच्यासाठी पत्रापत्री खास आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, प्रभावळकरांच्या पत्रापत्री पुस्तकाला साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला. सोलापुरात झालेल्या कार्यक्रमावेळी केंकरेही तिथे उपस्थित होते. तेव्हा पहिल्यांदा दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून त्यांनी पत्रापत्री पुस्तक वाचलं आणि यावर एक रंजक अभिवाचनाचा प्रयोग होऊ शकतो हे त्यांच्या डोक्यात आलं. पत्रापत्रीच्या लेखनाबद्दल बोलताना प्रभावळकर म्हणाले की, मी जेव्हा माधवराव आणि तात्यासाहेब यांची पत्रं लिहीत होतो तेव्हा मी माधवराव आणि तात्यासाहेब होऊन लिहित होतो. त्यामुळे त्यात लेखक आणि नट दोघंहा डोकावतात. ही पत्रापत्रीची जमेची बाजू आहे. मला नेहमी वाटतं की संगीताचा जसा कान असतो तशीच विनोद किंवा व्यंग टिपण्याची एक दृष्टी असते. याचा वापर मी या अभिवाचन दृक आविष्कारामध्ये पाहायला मिळतं.

पत्रापत्री निमित्ताने दिग्दर्शक विजय केंकरेंसोबत काम करण्याबद्दल बोलताना प्रभावळकर म्हणाले की, ‘यापूर्वी मी विजयसोबत सई परांजपे यांच्या नांदा सौख्यभरे नाटकाचे अमेरिकेतील प्रयोग केले होते आणि जयंत दळवी यांच्या नाती गोती नाटकात आम्ही काम केलं होतं. याशिवाय विजयच्या दिग्दर्शनाखाली मी आतापर्यंत सातवेळा काम केलं आहे. आम्हा दोघांनाही एकमेकांच्या कामाची पद्धत अगदी पूर्णपणे माहीत आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून माझी शक्तीस्थानं काय आहेत आणि माझ्या मर्यादा काय आहेत हे त्याला पूर्णपणे माहीत आहे. तसंच विजयला एका व्यक्तिरेखेतून नक्की काय हवंय हे मला पटकन कळतं. त्यामुळे ही संपूर्ण प्रोसेस फारच रंजक होती.’

त्यामुळे शंभरी पार केलेल्या दिग्दर्शकाचा अनोखा प्रयोग आणि हरहुन्नरी कलाकाराची वाचन व अभिनयातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची कसब अनुभवायची असेल तर पत्रापत्री पहावंच लागेल.

Story img Loader