scorecardresearch

वयाच्या १७ व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री होती प्रेग्नंट

ही अभिनेत्री आजही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

झगमगत्या बॉलिवूडमध्ये काही चेहरे सध्याच्या घडीला रुपेरी पडद्यावर फारसे सक्रिय नसले तरीही त्यांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. अशा चेहऱ्यांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडिया. ‘बॉबी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करणाऱ्या डिंपल यांच्या लोकप्रयतेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. एका वेगळ्याच अंदाजात आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री वयाच्या १७ व्या वर्षी गर्भवती होती. मात्र ही गोष्ट फार कमी जणांना माहित आहे.

डिंपल कपाडिया यांनी वयाच्या १६ व्या वर्षी राज कपूर दिग्दर्शित ‘बॉबी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या सेटवर डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि या दोघांनी लग्न केलं. डिंपल आणि राजेश खन्ना यांच्यामध्ये १५ वर्षांचं अंतर आहे. मात्र तरीदेखील या दोघांनी लग्न केलं. विशेष म्हणजे केवळ १७ व्या वर्षी डिंपल या गरोदर राहिल्या. एवढ्या कमी वयामध्ये गरोदर असलेल्या डिंपल यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव ट्विंकल असं असून आज तीदेखील आपल्या आई-वडिलांप्रमाणे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दरम्यान, बॉलिवूड लोकप्रिय जोड्यांमध्ये राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. गेले कित्येक वर्ष एकमेकांची साथ देणारी ही जोडी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र २०१२ मध्ये राजेश खन्ना यांचं निधन झालं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dimple kapadia age 17th pregnant personal life ssj

ताज्या बातम्या