दिग्दर्शक अभिजित पानसे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांची रानबाजार ही वेबसीरिज चांगलीच गाजली. त्यानंतर अभिजित पानसेंची राजी-नामा ही नवीन वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचे पाहायला मिळाली. अभिजित पानसे हे सिनेसृष्टीसह राजकारणातही सक्रीय असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिजित पानसे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच त्यांनी त्यावर थेट वक्तव्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिजित पानसे यांनी नुकतंच प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी सिनेसृष्टीसह राजकीय विषयांवरही भाष्य केले. ते सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. या मुलाखतीत अभिजित पानसेंना तुम्ही शिंदे गटात जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा : “मागे ED लागलं तर…”, अभिजित पानसे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिजित पानसे यांचे उत्तर

“हा प्रश्न मला कृपया विचारु नका. लोक इतकंच एडिट करुन मला त्रास देतील. हे धाधांत खोटं आहे. मला आता इथून तिकडे, तिकडून इकडे यात अजिबात रस नाही. मला यापुढील राजकारण निश्चित ज्या पक्षात आहे, त्याच पक्षातून करायचं आहे. त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे काम करायचं आहे.

पण खरी भूक माझी राजकारणाबद्दलची विचारशील तर मला महाराष्ट्राच्या, ग्रामीण भागातील किंवा महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा स्तर हा उंचवायचा आहे. तो बदलायचा आहे. माझे वडील रमेश पानसे हे या देशातील मोठे बालशिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यामुळे माझ्या घरी ते वातावरण कायम असते.

मी अनेक वर्ष भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला आताचा अभ्यासक्रम माहिती आहे. माझ्या त्याबद्दल अनेक ठोस कल्पना आहेत”, असे ते म्हणाले.

आणखी वाचा : “अनेक समज…” ‘पठाण’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून राम गोपाल वर्मांचे ट्वीट

दरम्यान सध्या अभिजित पानसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात काम करत आहेत. त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्याबरोबरच एक उत्तम दिग्दर्शक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असलेल्या ‘रानबाजार’ ही वेबसीरिज त्यांनी दिग्दर्शित केली होती. याला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. ‘रानबाजार’मधील सत्तानाट्यानंतर ‘राजी-नामा’ ही वेबसीरिजही चांगलीच गाजली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director abhijit panse may enter into cm eknath shinde group said politics nrp
First published on: 27-01-2023 at 14:05 IST