scorecardresearch

बॉयकॉट ट्रेंडदरम्यान ‘ब्रम्हास्त्र’चा नवा टीझर प्रदर्शित, करण जोहरने व्हिडीओ शेअर करताच नेटकरी म्हणाले…

दिग्दर्शक करण जोहरने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा नवा टीझर सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

बॉयकॉट ट्रेंडदरम्यान ‘ब्रम्हास्त्र’चा नवा टीझर प्रदर्शित, करण जोहरने व्हिडीओ शेअर करताच नेटकरी म्हणाले…
दिग्दर्शक करण जोहरने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा नवा टीझर सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये ‘बॉयकॉट’ हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर खान आणि अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारचे चित्रपट लोकांनी बॉयकॉट केले. आता नेटकरी येणाऱ्या इतरही मोठ्या स्टार्सच्या आणि स्टारकिड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करताना दिसत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’, हृतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’, सलमान खानचा ‘टायगर ३’ या चित्रपटांना बॉयकॉट करायची मागणी होऊ लागली आहे. अशातच आता ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा – चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबासह अक्षय कुमार लंडनला रवाना, पत्नी परदेशातच राहणार कारण…

९ सप्टेंबरला ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. त्याचपूर्वी चित्रपट प्रदर्शित होण्यास दहा दिवस बाकी म्हणत करण जोहरने या चित्रपटाचा नवा टीझर सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या टीझरला काही तासांमध्येच अधिक व्ह्युज मिळाले आहेत. मात्र अनेकांनी टीझर पाहता नकारात्मक कमेंट देखील केल्या आहेत. ट्वीटरवर तर चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणी होत आहे.

करणने शेअर केलेल्या या नव्या टीझरमध्ये रणबीर कपूर दिसत आहे. तसेच यामध्ये चित्रपटामधील अभिनेत्रीचा एक संवाद ऐकायला मिळत आहे. तसेच चित्रपटामध्ये वापरण्यात आलेल्या विशेष तंत्रज्ञानाची यामध्ये झलक पाहायला मिळते. करणने हा टीझर ट्विट करताच नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपट आपटणार आहे, बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट ब्रम्हास्त्र, चित्रपट सुपरफ्लॉप असणार अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

अयान मुखर्जीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स यांचं मिश्रण असलेल्या चित्रपटात सर्व अस्त्रांचं शक्तीस्थान असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’च्या शक्तीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांचा देखील दमदार अंदाज पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Director karan johar share new teaser of ranbir kaoopr aalia bhatt brahmastra movie audience says boycott film watch video kmd

ताज्या बातम्या