scorecardresearch

करण जोहरने शेअर केला ‘ब्रह्मास्त्र’चा नवा व्हिडीओ, चाहते म्हणाले “अरे हा तर… “

रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

करण जोहरने शेअर केला ‘ब्रह्मास्त्र’चा नवा व्हिडीओ, चाहते म्हणाले “अरे हा तर… “
brahmastra video

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे तीन भाग असणार आहेत. जबरदस्त स्टार कास्ट आणि मोठ्या खर्चासोबतच मोठी मेहनत या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने घेतली आहे. मात्र लालसिंग चड्ढाप्रमाणे ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड देखील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नुकताच करण जोहरने या चित्रपटाचा नवा टीझर सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे होता. या टीझरला काही तासांमध्येच अधिक व्ह्युज मिळाले आहेत. चित्रपटाच्या या नव्या टीझरमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा नवा लूक पाहायला मिळाला. आता करणने एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक माणूस उभा आहे आणि चार गोष्टी आकाशातून येतात आणि त्याच्या खांद्यावर जोडल्या जातात. हा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी लगेचच हा अभिनेता कोण असू शकतो यावर चर्चा करायला सुरवात केली. कारण या व्हिडिओमध्ये अभिनेत्याचा चेहरा दिसत नाही.

आलिया- रणबीरने केली पाकिस्तानच्या पूरग्रस्तांना मदत? काय आहे व्हायरल ट्वीटमागचं सत्य

काही चाहत्यांनी दावा केला आहे की हा अभिनेता म्हणजे ‘शाहरुख खान’ आहे. शाहरुखच्या ‘अशोका’ चित्रपटातील लूकची साधर्म्य असलेला हा लूक आहे तर एका चाहत्याचे असे म्हणणे आहे हा चित्रपट ‘रा वन’ सारखाच वाटतो आहे. तर आणखीन एक चाहत्याचे म्हणणे आहे की, हा अभिनेता म्हणजे ‘रणवीर सिंग’ आहे. गेल्या महिन्यात जेव्हा दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या चित्रपटात येणार असल्याची चर्चा समोर आली, तेव्हा बॉलिवूड हंगामातील एका सूत्राने सांगितले की, जर आलिया भट, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग असे कलाकार जर एका चित्रपटात एकत्र आले तर त्यांना पडद्यावर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

ब्रम्हास्त्र निर्मात्यांकडून मात्र शाहरुख दीपिका यांच्या भूमिकांची स्पष्टता समोर आलेली नाही. ‘ब्रह्मास्त्र’ यावर्षी ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Director karan johar shared new video of brahmastra fans commented shaharukh khan or ranveer singh spg