"त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही..." केदार शिंदे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक | Director Kedar Shinde facebook account and page get hack share instagram post viral nrp 97 | Loksatta

“त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही…” केदार शिंदे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

त्यांनी स्वत: याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

“त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही…” केदार शिंदे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक
केदार शिंदे फेसबुक अकाऊंट हॅक

केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र या अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या केदार शिंदे हे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. मात्र नुकतंच केदार शिंदेबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. केदार शिंदे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. त्यांनी स्वत: याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांना फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट करताना त्यांनी महत्त्वाचं सावध रहा, सतर्क राहा, सुरक्षित रहा असे आवाहनही केले आहे.
आणखी वाचा : “पण खंत एकच आहे की शिवसेनेचा…”, केदार शिंदे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“नमस्कार, काल रात्री माझे फेसबुक अकाऊंट (पर्सनल आणि पेज) हॅक झाले असून आता त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही… त्यामुळे जर या दोन्ही माध्यमांद्वारे तुमच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क किंवा संवाद साधला जात असेल तर कृपया सावध रहा आणि कोणत्याही प्रकारे रिप्लाय अथवा मेसेज करु नका! धन्यवाद!” अशी पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ असे या चित्रपटाचे नावं आहे. केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.

या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 11:02 IST
Next Story
आधी कॉफी डेट अन् आता थेट लॉंग ड्राइव्ह; अक्षया-हार्दिकच्या रोड ट्रिपचा फोटो व्हायरल