मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच केदार शिंदेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी अभिनेत्री जॅझी बॅलेरीनी हिच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी या फोटोला एक हटके कॅप्शन दिले आहे. “मी या इंग्रज मुलीसोबत सध्या काम करतोय.. आपला देश आपली संस्कृती सोडून साता समुद्रापार आलेल्या मुलीसाठी, माझ्या सहीत सगळच नवं आहे. सध्या पुन्हा इंग्रजी माध्यमाच्या धडे गिरवतोय. So now I can talk English, I can walk English.. because English is very funny language”, असे त्यांनी या पोस्टसोबत म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director kedar shinde share instagram post with actress jazzy ballerini nrp
First published on: 31-03-2022 at 15:53 IST