भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणारं व्यक्तीमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर. खरं तर स्वातंत्र्य लढात सावकरांच्या असलेल्या योगदानावर आजवर अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. सावरकरांचे देशात जितके समर्थक आहेत तितकेच टीकाकार. अशातच गेल्यावर्षी सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता वर्षभराने म्हणजेच आज २८ मे रोजी थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची १३९ व्या जयंतीनिमित्त सावरकरांचा पहिला लूक लाँच करण्यात आला आहे.

अभिनेता रणदीप हुड्डा हा या चित्रपटात विनायक दामोदर सावरकरांची व्यक्तिरेखा साकारत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त रणदीप हुड्डा यांचा पहिला लूक लाँच करण्यात आला आहे. या पोस्टरवर ‘हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है’ असे लिहिले आहे. या चित्रपटाचे शूटींगला ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात होणार आहे.

swatantra veer savarkar budget
रणदीप हुड्डाने ज्यासाठी मालमत्ता विकली, त्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं मूळ बजेट किती? जाणून घ्या
amruta khanvilkar shares special post for ankita lokhande
सुबोध भावेचा आवाज अन् रणदीप-अंकिता…; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यावर अमृता खानविलकरची पोस्ट, म्हणाली…
Randeep Hooda says he sold his fathers properties for Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी वडिलांची मालमत्ता विकली, रणदीप हुड्डाचा खुलासा; म्हणाला, “मी खूप…”
pravin tarde reacts on swatantrya veer savarkar movie
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हा हर्षद मेहता, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांचे चित्रपट ट्रेंडमध्ये असताना मला वीर सावरकरांच्या जीवनाची कथा सांगण्यात जास्त रस वाटला कारण ते भारताचे पहिले डायनॅमिक हिरो होते. १९४७ मधील फाळणी वाचवायला मदत करणारे एकमेव वीरपुरुष होते. या चित्रपटाद्वारे मला, केवळ एक चित्रपट निर्माता म्हणून नव्हे, तर एक भारतीय म्हणून, सावरकरांच्या संघर्षाची वस्तुस्थिती जगाला सांगायची आहे.”

“स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा धाडसी लढा, इंग्रजांना घाबरवणारे त्यांचे निर्भीड व्यक्तिमत्त्व आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची हिंदुत्वासाठी असलेली बांधिलकी खूप प्रेरणादायी आहे. सर्वांनी गैरसमज करून घेतलेल्या या हिरोला आपल्याला आता समजून घेण्याची वेळ आली आहे. त्यांना जे हवं होतं ते त्यांना कधीच मिळालं नाही आणि म्हणूनच सावरकरांना भारतरत्न आणि नोबेल पारितोषिक दिलं जावं अस मी निवेदन करतो”, असेही संदीप सिंग म्हणाले.

“लोकांच्या मनात सावरकरांबद्दल वेगवेगळे आवृत्त्या असू शकतात, पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटातील सावरकरांच्या व्यक्तिरेखेपेक्षा काही फरक पडणार नाही. सावरकर वास्तविक जीवनात होते. ते प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक होते आणि आम्ही हे सुनिश्चित करू की त्यांना कोणताही भारतीय कधीही विसरणार नाही”, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले.

अभिनेता रणदीप हुड्डा यांनी याबाबत बोलताना म्हटले की “भारताच्या स्वातंत्र्य आणि आत्म-वास्तविकतेच्या लढ्यातील सर्वात उंच नायकांपैकी एकाला हा सलाम आहे. मला आशा आहे की मी एका खऱ्या क्रांतिकारकाचे योगदानाचे आव्हान पेलू शकेन आणि इतक्या दिवसांपासून दडून राहिलेली त्याची खरी कहाणी जनतेला सांगू शकेन.”

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मितीची धुरा रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी पेलली आहे.