scorecardresearch

ऐश्वर्या राय-बच्चननंतर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, दिग्दर्शकांनीही मानले आभार

३० सप्टेंबर रोजी ‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ऐश्वर्या राय-बच्चननंतर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, दिग्दर्शकांनीही मानले आभार
विक्रम, जयराम रवी, कार्थी, ऐश्वर्या राय-बच्चन, त्रिशा कृष्णनसह अनेक दिग्गज कलाकार एकाच चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

मणी रत्नम यांचा बहुचर्चित ‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट थोड्याच कालावधीमध्ये प्रदर्शित होणार आहे. विक्रम, जयराम रवी, कार्थी, ऐश्वर्या राय-बच्चन, त्रिशा कृष्णनसह अनेक दिग्गज कलाकार एकाच चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी ए.आर.रहमान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ‘पी.एस. १’ च्या निमित्ताने मणी रत्नम आणि ए.आर.रहमान ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये गुंतलेली आहे.

‘पोन्नियन सेल्वन’ ही कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेली तमिळ भाषेमधील प्रसिद्ध कादंबरी आहे. १९५०-१९५४ मध्ये कल्की या साप्ताहिकामध्ये पोन्नियन सेल्वन या नावाने एक लेख छापला जात असे. या लेखांना मिळालेली लोकप्रियता पाहून लेखकाने कथेतील सर्व भाग एकत्र करुन त्या साहित्याला कादंबरीचे रुप दिले. साप्ताहिकामध्ये छापला जाणारे लेख मणी रत्नम नियमितपणाने वाचायचे. काही काळानंतर ते दिग्दर्शन क्षेत्राकडे वळले. तेव्हा या कादंबरीवर एक चित्रपट तयार करावा अशी इच्छा त्यांच्या मनात होती.

आणखी वाचा – आमिरच्या ‘गजनी’मुळे हॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक चांगलाच अस्वस्थ झाला होता; अनिल कपूरने सांगितला किस्सा

मणी रत्नम यांनी अजय देवगन या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे म्हटले आहे. या बिगबजेट चित्रपटाच्या हिंदी रुपांतराला अजयने आवाज दिला आहे. आवाजाच्या माध्यमातून तो ‘पोन्नियन सेल्वन’शी जोडला गेला आहे. मणी रत्नम यांनी यासाठी त्याचे आभार देखील मानले आहेत. तसेच चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरला आवाज दिल्याबद्दल त्यांनी अभिनेता अनिल कपूर याचेही आभार व्यक्त केले आहेत.

आणखी वाचा – “मीदेखील पठाणची वाट पाहतोय” असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास ‘पठाण’ लूक

एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, “१९८७ मध्ये मी कमल हासनसह ‘नायकन’ हा चित्रपट बनवत होतो. त्या वेळी मी एम जी रामचंद्रन यांच्याशी पोन्नियन सेल्वनबद्दल बोलून ठेवलं होतं. आम्हा दोघांनाही हा चित्रपट तयार करायचा होता. आम्ही कमल हासनला नायक म्हणून पाहत होतो. चित्रपटाची कथा लिहिताना मला याची भव्यता जाणवली. एका चित्रपटामध्ये कादंबरीतील इतकी मोठी गोष्ट दाखवणं तेव्हा अशक्य होतं. त्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. पण आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या