scorecardresearch

‘चंद्रमुखी’तील ‘बत्ताश्या’ची भूमिका साकारणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेता, व्हिडीओ व्हायरल

आता नुकतंच या चित्रपटातील आणखी एक पात्राचे नाव समोर आले आहे.

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. त्यानंतर हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटात प्यादंची भूमिका कोण साकारणार?? असा प्रश्न अनेकांना पडला होता. नुकतंच या प्रश्नाचे उत्तर समोर आलं आहे.

बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानंतर आता नुकतंच या चित्रपटातील आणखी एक पात्राचे नाव समोर आले आहे.

‘चंद्रमुखी’साठी आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकरची निवड का केली? प्रसाद ओकने सांगितले कारण

अभिनेता आदिनाथ कोठारे याने नुकतंच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. प्याद्यानं एकदा का ठरवलं तर बाजी कश्शी उलटंल कुनाला बी कळनार नाई.. या प्याद्याचं नाव हाय बत्ताशा!, असे कॅप्शन आदिनाथने दिले आहे. त्यासोबत आदिनाथने समीर चौगुले बत्ताशाचे पात्र साकारत असल्याचे सांगितले आहे.

त्यासोबत त्याने एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत आदिनाथ कोठारे आणि समीर चौगुले एका गाडीत बसून गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. यावेळी समीर चौगुले हा त्याची ओळख सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आदिनाथची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

“मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती…”, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक दावा

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Director prasad oak chandramukhi marathi movie these actor will play battasha character nrp

ताज्या बातम्या